Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पालीत माकडे, वानरांच्या टोळीची दहशत

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली गावात माकड व वानरांनी मागील काही महिन्यांपासून  उच्छाद घातला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक  हैराण झाले आहेत. या माकडांनी हल्ले करून काही नागरिकांना जखमी केले आहे. त्यामुळे या माकडांची दहशत माजलीय.  या वानर व माकडांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी विद्येश आचार्य यांनी …

Read More »

भरती, अवकाळी पावसाने उडवे भिजले

पेण तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पेण : प्रतिनिधी दिवाळी लक्ष्मीपूजन आमावस्येच्या दिवशी समुद्रात आलेली मोठी उधाण भरती व अवकाळी पावसाचा फटका पेण तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खार्‍या पाण्यात भात पिकाचे उडवे भिजल्याने कणे, वाशी, सरेभाग, दिव, वढाव येथील शेती व शेतकर्‍यांचे ऐन दिवाळी सणात मोठे आर्थिक नुकसान …

Read More »

कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत भाऊबीज

कर्जत : बातमीदार आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 6) कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत जाऊन तेथील सर्व कुटुंबांना दिवाळी फराळ, स्टील ताट, टॉवेल, फटाके देऊन आदिवासी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद, महिला अध्यक्षा रेवती …

Read More »

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कर्जतमध्ये पोलिसांना फराळ वाटप

कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडच्या कार्यकर्त्यांनी दीपावलीनिमित्त तालुक्यातील कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना फराळ देऊन शुभेच्छा दिल्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, प्रशांत देशमुख, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, विहिंप कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश …

Read More »

कर्जतमध्ये पावसाच्या सरी

वाहतूक कोंडी, भाऊरायांचा हिरमोड कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार परतीच्या पावसाचा तडाखा शनिवारी (दि. 6) कर्जतला बसला. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. भाऊबीजेचा दिवस असल्याने बहिणीकडे जाणार्‍या बंधुरायांची एकच त्रेधातिरपीट उडाली. कर्जत चारफाटा परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौक बाजूकडे सुमारे …

Read More »

कळंबमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का

समर्थकांसह शाखाप्रमुखाचा ‘जय महाराष्ट्र’ कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब गावातील शिवसेनेचे संस्थापक असलेल्या मिरकुटे कुटुंबातील कार्यकर्त्यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी पक्ष सोडल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समाजाला जात आहे. कळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून खर्‍या अर्थाने पक्षाची पाळेमुळे रुजविणारे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, त्यांचे सहकारी …

Read More »

‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. …

Read More »

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक गांधारपाले गाव हद्दीत शनिवारी (दि. 6) दुपारी एक दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र पाथरटकर आणि हरिश्चंद्र बाळू देवळे (दोघे रा. देहगाव, दापोली) हे दोघे दुचाकी (एमएच 4-जेझेड 5968)वरून दापोली …

Read More »

अवकाळी पावसाचा तडाखा; भातपिकांचे अतोनात नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे …

Read More »

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस; बळीराजा हवालदिल

पाली, मुरूड ः प्रतिनिधीसर्व जण दिवाळीचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करीत असताना रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर पीक भिजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.दीपावली पाडव्याच्या दिवशी वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार …

Read More »