Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमधील आपद्ग्रस्तांना शासकीय मदत द्या

सरपंच मनीष नांदगावकर यांची उपविभागीय अधिकार्‍यांकडे मागणी मुरूड : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील मच्छीमार, शेतकरी व स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यापैकी अनेकांना शासकीय मदत येऊनसुद्धा ती मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करून येथील आपद्ग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी …

Read More »

कर्जतमध्ये लसीकरण, मास्कविषयी जनजागृती

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे मुंबई या संस्थेमार्फत कर्जत शहरातील आमराई रिक्षा स्टँड येथे कोरोना लसीकरण व मास्क लावण्याचे फायदे काय होऊ शकतात, याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युनायटेड वे मुंबईच्या रेखा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व लसीकरणाचे फायदे आणि काळजी कशी घ्यावी हे पटवून दिले. कर्जत …

Read More »

पेणमधील पोलीस वसाहतीची दैनावस्था

नवनिर्मिती अडकली लालफितीत पेण : प्रतिनिधी येथील पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांच्या वसाहतींची दयनीय अवस्था झाली असून, काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने काही पोलीस कर्मचार्‍यांना या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तर काही कमर्चारी जीवाच्या भीतीने भाड्याच्या घरात राहत आहेत. पेण तालुक्यात पोलीस अधिकार्‍यांसह सुमारे 128 …

Read More »

सोशल मीडियावर आक्षेपजनक पोस्ट; खोपोलीत तणाव

खोपोली : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्याच्या संदर्भात सोशल मीडियावर खालापूर तालुक्यातील एका तरुणाने आक्षेपजनक पोस्ट टाकली. ती पोस्ट झपाट्याने वायरल झाल्यानंतर खोपोलीमध्ये याबाबत तणाव निर्माण झाला. या पोस्टला आक्षेप घेत मंगळवारी (दि. 2) सकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर अनेक तरुणांनी धडक देत, संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी …

Read More »

भाजप कामगार मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी पालीतील राजेंद्र गांधी यांची नियुक्ती

पाली : प्रतिनिधी भाजप कामगार मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी सुधागड पाली येथील ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र महादेव तथा भाऊ गांधी यांची, तर सुधागड तालुका अध्यक्षपदी रवींद्र खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजप कामगार मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले. राजेंद्र गांधी …

Read More »

नियम पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जा!

माथेरान पोलिसांचा अश्वचालकांना इशारा कर्जत : बातमीदार पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरविणे, अवाजवी दर आकारणे, विनापरवाना घोडे चालविणे, तसेच नियमांचे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर यांनी येथील अश्वचालकांना दिला. कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावले माथेरानकडे वळू लागली असून, दिवाळीच्या सुट्टीत …

Read More »

पेणच्या आराध्य साळवीला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

पेण ः प्रतिनिधीमध्य प्रदेशातील खंडवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एल्बो-बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पेण येथील आराध्य अजित साळवी याने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक पटकावून दिले.महाराष्ट्र एल्बो-बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बॉक्सिंगची टीम राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. यामध्ये पेण गणपती वाडीत राहात असलेल्या आराध्य साळवी याने …

Read More »

भुतिवलीवाडीत किराणा सामान वाटप

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनने कर्जत तालुक्यातील भुतीवलीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणार्‍या किराणा सामनाचे वाटप केले. या वाडीमधील 12 आदिवासी लोकांच्या घरात या वर्षी पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील धान्य खराब झाले होते. येथील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी फाउंडेशनकडून ही मदत …

Read More »

कर्जतमध्ये घरफोड्या करणार्‍याला अटक

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील मुद्रे येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील घरफोडी प्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपींना मुद्देमलासह ताब्यात घेतले. कर्जत मुद्रे येथील रेव्हेन्यु कॉलनीमध्ये, राहणारे रंजित धोंडीबा चव्हाण आणि त्यांचे कुटुंब घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने 13 ऑक्टोबर रोजी घरफोडी करून त्यांच्या फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण …

Read More »

आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करा; पेण तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी

पेण : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामातील भाताची कापणी करण्यास सुरुवात झाली असून, पेण तालुक्यात अद्याप आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. बाजारात भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पेण तालुक्यातील शेतकरी करीत आहे. रायगड …

Read More »