कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …
Read More »सायकलपटू अॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम
90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …
Read More »गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी खोपोली ः प्रतिनिधीगोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका …
Read More »पर्यावरणपूरक होळी साजरी करा; पर्यावरणप्रेमी प्रा. उदय मानकावळे यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी निसर्गाचे संतुलन राखून वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन होळीच्या पार्श्वभूमीवर पेण एज्युकेशन सोसायटीतील प्रा. उदय मानकवळे यांनी नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, होळी हा अवगुणांची होळी करणारा सण आहे. हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. पुराणात भक्त प्रल्हादापासून अनेक कथांचा …
Read More »नेमेचि येते पाणीटंचाई!
कर्जत तालुक्यात पंचायत समितीवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही कर्जतमधील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. गतवर्षी कर्जत तालुक्यातील 57 आदिवासीवाड्या आणि 14 गावे पाणीटंचाईग्रस्त होती. या वर्षी तालुक्यातील 59 आदिवासीवाड्या आणि 17 गावे पाणीटंचाईग्रस्त असून यंदा पाणीटंचाई जास्त असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासीबहुल …
Read More »खोपोली बसची वेळ बदला -भाजपची मागणी; एसी बससाठीही आग्रह
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्गाच्या सोयीसाठी खोपोली भाजपने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येथील सकाळची पहिली बस 6 वा. तसेच दुपारदरम्यान एसी बस सुरू करण्याचे निवेदन पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी व शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, …
Read More »कर्जतमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा
कर्जत ः बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यात असंख्य भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »चला होवू जलसाक्षर!
वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे कमी होत आहेत. त्यातच पावसाचे अत्यल्प प्रमाण, ऋतूमानातील अनिश्चित बदल यामुळे देशातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यावर मात करून पाण्याच्या बाबतीत भविष्यकाळ सुरक्षित करावयाचा असेल तर जलसंवर्धन व पाणीबचत ही काळाची …
Read More »माथेरानचे व्यापारी समस्यांच्या विळख्यात
प्रशासनाला आवाहन कर्जत ः बातमीदार माथेरानमधील व्यापार्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे व्यवसायात आलेली मंदी, फेरीवाल्यांचे व्यवसायावर होत असलेले अतिक्रमण आणि बाहेरील घोडेचालकांनी पर्यटकांची चालवलेली फसवणूक अशा अनेक समस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. कोरोना परिस्थितीत माथेरानमध्ये मंदावलेला व्यवसाय यावर विचारमंथन करण्यासाठी व्यापारी फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.शहरात फेरीवाल्यांची वाढती संख्या …
Read More »नाना पोरे भाजप वाहतूक सेल जिल्हा संयोजकपदी
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तरुणांचे नेतृत्व समजल्या जाणार्या नाना पोरे यांच्यावर भाजपच्या वाहतूक सेलच्या जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखविलेला हा विश्वास आपण सार्थ करू, असा विश्वास पोरे यांनी व्यक्त केला. महाड शहरातील तरुणांचे नेतृत्व करणारे संकेत उर्फ नाना पोरे …
Read More »