महावितरणने केला पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित कर्जत ः बातमीदार ग्रामीण भागातील रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी अंधार दूर करणारे पथदिवे गेले काही दिवस बंद आहेत. रायगड जिल्हा परिषदेने त्या पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी रक्कम भरली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. दरम्यान, नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्यांवरून राजकारण तापले असून कर्जत तालुक्यातील …
Read More »भारीट पक्ष्यांचा कोकणातील मुक्काम वाढला
पाली ः प्रतिनिधी हिवाळ्यात पूर्व युरोप व पूर्व इराण देशांतून जवळपास 7000 किमीचा प्रवास करून काळ्या डोक्याचे भारीट पक्षी कोकणात येतात आणि हिवाळा संपला की आपल्या मूळ ठिकाणाकडे हळूहळू परततात, मात्र उन्हाळा सुरू झाला तरीही हे पक्षी थव्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी वावरताना पक्षी अभ्यासकांना दिसत आहेत. मुबलक खाद्य व पोषक …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघातांमध्ये दोघे जखमी
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री (दि. 21) मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात घडले. पहिल्या अपघातात टँकरचालक पुण्याहून मुंबईकडे जात असताना टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. ही घटना खोपोली एक्झिटजवळ रात्री 9.30च्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात वाहनचालक बचावला. कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यामुळे मोठ्या …
Read More »श्रमिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कर्जत ः बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेरळमधील श्रमिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ भाजपच्या वतीने श्रमिक आणि कामगार वर्गातील 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथील जेनी ट्युलिप शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमाला भारतीय …
Read More »महाराष्ट्रात प्रथमच होणार गिधाडांची गणना
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक पद्धतीने गिधाड संवर्धनाचा प्रकल्प राबविणारे रायगड जिल्ह्यातील पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेमार्फत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या गिधाड संवर्धन व संशोधन प्रकल्पांतर्गत 21 मार्च या जागतिक वनदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड (पाली) या तालुक्यांतून गिधाडांची गणना सुरू आहे, मात्र या कार्यात …
Read More »कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कर्जत तालुक्याला विळखा; एका आठवड्यात 69 जण पॉझिटिव्ह
कर्जत ः प्रतिनिधी एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची रेलचेल सुरू झाली. …
Read More »नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पेण भाजपची मागणी
पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख …
Read More »राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा हल्लाबोल
कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …
Read More »सायकलपटू अॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम
90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …
Read More »गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी खोपोली ः प्रतिनिधीगोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका …
Read More »