26 लाखांच्या सतरंज्या जळून खाक माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राज्यमार्गावर माणगावजवळ गुरुवारी (दि. 18) चालत्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने टेम्पोतील सुमारे 26लाख रुपयांच्या सतरंज्या जळून खाक झाल्या. नागपूर येथून सतरंज्या घेवून निशाण कार्गो ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (एमएच-12, एचडी-4448) म्हसळा, श्रीवर्धनकडे येत होता. तो गुरुवारी सकाळी माणगाव परिसरातील दिघी-पुणे राज्यमार्गावरील …
Read More »महाड-रायगड रस्ता दुरुस्त करावा
स्थानिक ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी महाड-रायगड रस्ता गेल्या वर्षापासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शिवप्रेमींचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाकडे केली आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड-रायगड हा सुमारे 24 …
Read More »महावितरणने कारभार सुधारावा
खालापुरातील महिलांचे निवेदन खोपोली : प्रतिनिधी सतत खंडित वीज पुरवठा, धोकादायक, उघडे विद्युत जनित्र याबाबत बचत गटाच्या महिलांनी खालापूर महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना जाब विचारत कारभार सुधारण्यासाठी निवेदन दिले. सध्या महावितरणने वीज बिल वसुली एवढेच ध्येय्य ठेवले असून, ग्राहकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खालापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे …
Read More »रायगडचे क्रीडामहर्षी
रायगड हा सामजिक कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा जिल्हा. या जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. त्याची दखल त्या – त्या वेळच्या सरकारांना घ्यावी लागली. आंदोलकांच्या या जिल्ह्यात क्रीडाकार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. या जिल्ह्यात क्रीडाक्षेत्रातदेखील आता हळूहळू प्रगती होतेय. रायगड जिल्ह्याची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी ज्या काही मोजक्या लोकांनी प्रयत्न केले त्यात नथुराम पाटील यांचे …
Read More »अंबा नदी संवर्धनाची गरज; प्रदूषण व मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्यात
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषणाने वेढले आहे. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी व कचरा, वाळू उपसा यामुळे अंबा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नदी संवर्धनाची मागणी होत आहे. खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो …
Read More »पेण, अलिबागला जाणार्या गाड्या रद्द; कर्जत परिसरातील सकाळी प्रवास करणार्यांची गैरसोय
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामस्थांना अनेकदा शासकीय कामांसाठी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात जावे लागते. मात्र कर्जत एसटी आगाराने सकाळच्यावेळी पेण, अलिबाग येथे जाण्यासाठी असलेल्या तीन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग ते कर्जत हे अंतर साधारण 100 किलोमीटर आहे. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी …
Read More »ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीचे प्रयत्न त्रोटकच
अमेरिकेतील अॅमेझॉन आणि ब्राझिलच्या जंगलात लागलेली आग अनेक महिने पेटत राहिली आणि त्यामुळे होणार्या ग्लोबल वॉर्मिंगची चर्चाही जगभर झाली. तापमानवाढीच्या या समस्येचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर सर्वत्र अनुभवण्यास मिळत असताना त्याबाबत जागतिक स्तरावर कधीही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण पातळीवरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रयत्न शक्य असताना त्यासाठीदेखील …
Read More »प्रसिद्ध कबड्डीपटूंचा अपघातात मृत्यू
इंदापूर : प्रतिनिधी कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात …
Read More »शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट; चाकरमानी हिरमुसले
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक कार्यक्रम, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम येणार्या शिमगोत्सव होणार असून, त्यामुळे भाविक, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण रायगडमध्ये शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा व चालीरीती यांच्याशी जोडलेल्या या उत्सवात लहानथोर आनंदाने …
Read More »कर्जत-मुरबाड रस्त्यावरील भागूचीवाडीचा तीव्र चढ आणि उतार होतोय कमी
कर्जत : बातमीदार कर्जत-मुरबाड रोड आता राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतरित झाला आहे. या रस्त्यावरील कळंब भागूचीवाडी येथील तीव्र चढाव हा वाहनचालकांसाठी परीक्षा पाहणारा होता. मात्र कर्जत-मुरबाड रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झाल्याने तो तीव्र चढाव आता कमी होत असून त्या चढवाच्या बरोबर असलेले तीव्र वळणदेखील कमी होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा जोडरस्ता …
Read More »