Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबाग एसटी आगाराचे नूतनीकरण रखडले

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी 2021पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपली तरी बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा नारळ फोडण्यात आला होता, मात्र कामाला सुरुवातही होऊ शकली नाही. साडेसहा …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांना लसीकरणात प्राधान्य द्यावे; प्रवासी संघटनेची मागणी

म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासाठी विशेष एसटी बसेसची सुविधा पुरविणारे रायगड विभागातील कोरोना योद्धे एसटी चालक-वाहकांसह कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी श्रीवर्धन-म्हसळा प्रवासी संघटनेचे अनिल महामूनकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब व रायगडच्या पालकमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा …

Read More »

ग्रामसेवकाला मारहाणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामसेवकाला मारहाण करणार्‍या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. केतन पांडुरग म्हात्रे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 21 जून 2016 रोजी बेलोशीत घडली होती. शेखर बळी बेलोशी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा संपल्यानंतर आरोपी केतन म्हात्रे …

Read More »

महाडीबीटी फार्मर पोर्टलला मुदतवाढ; नोंदणी करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

मुरूड ः प्रतिनिधी शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची दखल घेत शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महापोर्टलवर फलोत्पादन योजनांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना …

Read More »

पेण अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक

भाजपचे सुनील गोगटे यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा   कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदारपेण को. अर्बन बँक 10 वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. अर्बन बँकेचे एखाद्या मोठ्या बँकेत …

Read More »

रायगडात कोरोना प्रतिबंधक सुधारित आदेश जारी

अलिबाग : जिमाका कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट ही 50 टक्के इतक्या बसण्याच्या क्षमतेच्या मर्यादेत खालील प्रतिबंधाचे पालन करण्याच्या अधिनतेने सुरू राहतील. सिनेमागृह व नाट्यगृहामध्ये खाण्यायोग्य पदार्थ नेण्यास मनाई असेल, …

Read More »

महाडमध्ये अल्पवयीन मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंभावे येथील एका नऊ वर्षीय मुलावर तेथेच राहत असलेल्या तरुणाने बुधवारी (दि. 17) लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी गोरेगाव येथील येथील एक महिला आपल्या मुलांसह आपल्या माहेरी आली होती. या महिलेची अल्पवयीन …

Read More »

कोरोना रुग्ण आढळल्याने श्रीवर्धन प्रशासकीय भवन दोन दिवसांसाठी बंद

श्रीवर्धन : प्रतिनिधी दोन कर्मचारी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने  श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन या इमारतीमध्ये तहसील, प्रांत, तलाठी, मंडळ अधिकारी  त्याचप्रमाणे उपनिबंधक (दस्त नोंदणी) आदी कार्यालये आहेत. याच इमारतीत काम करणारे दोन कर्मचारी बुधवारी …

Read More »

माणगावजवळ चालत्या टेम्पोला आग

26 लाखांच्या सतरंज्या जळून खाक माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राज्यमार्गावर माणगावजवळ गुरुवारी (दि. 18) चालत्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने टेम्पोतील सुमारे 26लाख रुपयांच्या सतरंज्या जळून खाक झाल्या. नागपूर येथून सतरंज्या घेवून निशाण कार्गो ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (एमएच-12, एचडी-4448) म्हसळा, श्रीवर्धनकडे येत होता. तो गुरुवारी सकाळी माणगाव परिसरातील दिघी-पुणे राज्यमार्गावरील …

Read More »

महाड-रायगड रस्ता दुरुस्त करावा

स्थानिक ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी महाड-रायगड रस्ता गेल्या वर्षापासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शिवप्रेमींचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाकडे केली आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड-रायगड हा सुमारे 24 …

Read More »