Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

अलिबाग ़: प्रतिनिधी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 7 मार्चला सकाळी 10.30वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा …

Read More »

कर्जतच्या पत्रकारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट

पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण कर्जत : बातमीदार शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी  संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. 1) रायगडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्य …

Read More »

परळी ग्रामपंचायतीला रुग्णवाहिकेची भेट

सिटेक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी पाली : प्रतिनिधी सिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीला सर्व सोयींनी युक्त अशी रूग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच परळी येथे पार पडला. सिटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नासीर मुलाणी, तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची या वेळी समोयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे …

Read More »

हायवे मृत्यूंजयदूत योजनेला बोरघाटात प्रारंभ

खोपोली : प्रतिनिधी मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस केंद्रात सोमवारी (दि. 1) हायवे  मृत्युंजयदूत योजनेची सुरुवात करण्यात आली. एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार व पुढील उपचारासाठी कसे हलवायचे याचे प्रात्यक्षिक पवना ट्रॉमा केअर टीमने करून दाखविले. राज्याचे अप्पर वाहतूक …

Read More »

खोपोलीतील शिबिरात 65 जणांचे रक्तदान

कर्जत : बातमीदार येथील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी  श्री वासुदेव सेवा मंडळ आणि स्वराज मित्र मंडळ यांच्या सहकार्याने नुकतेच खोपोली येथील ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान केले. या शिबिरात घाटकोपर येथील समर्पण नर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रक्तसंकलनाचे काम केले. …

Read More »

साई खैरावाडीतील ग्रामस्थांनी घेतली गायिका अनुराधा पौडवाल यांची भेट

माणगाव : प्रतिनिधी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने लाखो रुपयांचा निधी खर्च करून माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावाची नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त केली आहे. साई खैरावाडी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 28) ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने डॉ. अनुराधा पौडवाल यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व गावाला …

Read More »

कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे बेमुदत उपोषण

 किरवलीकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले; समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनीला दर देण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी   कर्जत तालुक्यातील कर्जत, वांजळे, मुद्रे या गावांसह किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 33 शेतकर्‍यांची एकूण चार एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. आमच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणेच दर द्यावा, या मागणीसाठी किरवली ग्रामस्थांनी अलिबाग येथील …

Read More »

नागोठणे ‘रिलायन्स’विरोधात स्थानिक समितीकडून आंदोलनाचा इशारा

नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स व्यवस्थापन, खासदार सुनील तटकरे आणि प्रकल्पग्रस्त तथाकथित नेत्यांच्या 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत जो काही निर्णय घेण्यात आला आहे, तो आम्हाला मान्यच नसून वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीकडून सोमवारी (दि. 1) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात …

Read More »

रोठ ग्रामपंचायत कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान

धाटाव : प्रतिनिधी कोरोना काळात उत्तम सेवा बजावणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या कर्मचार्‍यांनी उत्तम योगदान दिले, त्यांचा रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामसेविका अलका बामगडे, कर्मचारी उदेश वारांगे, हरिभाऊ …

Read More »

आधी थकीत रक्कम अदा करा; मगच पुढील कामे सुरू करा!

दिघी बंदराबाबत स्थानिक आक्रमक मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील दिघी बंदराच्या विकासाचे काम आता अदानी स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक झोन कंपनीला मिळाल्याने या बंदराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच स्थानिक आक्रमक झाले आहेत. यापूर्वी केलेल्या छोट्या मोठ्या कामांची थकीत रक्कम अदा केल्याशिवाय बंदर विकासाचे काम सुरू करू देणार नाही, अशी …

Read More »