खोपोली ः प्रतिनिधीकोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असताना शनिवारी (दि. 27)रात्री खालापुरातील कलोते येथील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर हुक्का पार्टी आणि डिजेवर धिंगाणा घालणार्या 14 जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलोते हद्दीतील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर परवानगी नसताना पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल …
Read More »नाना पोरेंसह सहकार्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
महाड ः प्रतिनिधीमहाडमधील तरुण नेतृत्व व यशस्वी उद्योजक संकेत उर्फ नाना पोरे यांनी शनिवारी(दि. 27) आपल्या सहकार्यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महाड तालुक्याचा रखडलेला विकास, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांचे प्रश्न सेडविण्यासाठी स्थानिक नेतृत्व कमी पडत असून …
Read More »खंडाळा घाटात अनियंत्रित कारची दुचाकीला धडक
खोपोली : प्रतिनिधी खंडाळा घाटातून खोपोलीकडे येत असलेली कार सायमाळ पुढील पोलीस चौकी उतारावर अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने एका दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात कार सुरक्षा कठडा तोडून रस्त्यावरून खाली गेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातातील तिन्ही जखमींना खोपोली येथील रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. यात दुचाकीवरील एक व कारमधील …
Read More »रोह्यात नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात वाशी गावातील काही लहान मुले शनिवारी (दि. 27) सकाळी 12 वाजेदरम्यान गणपतीच्या डोहाजवळ नदीवर पोहायला गेली होती. या वेळी नदीपात्रात खोल पाण्याचा डोह असल्याने अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.शाळेला सुटी …
Read More »आदेश बांदेकर माथेरानचे पर्यटन ब्रँड अँबेसिटर
कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व झी मराठीच्या होम मिनिस्टर या कार्यकर्मातून भाऊजी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माथेरान शहरामध्ये पर्यटन वाढीकरीता पर्यटक राजदूत (ब्रँड अँबेसिटर) म्हणून निवड केली आहे. आदेश बांदेकर यांची केलेली …
Read More »घरफोडी करणार्या दोन अट्टल चोरट्यांना एलसीबीने केले जेरबंद
एक लाख 13 हजारांचा ऐवज हस्तगत अलिबाग ़: प्रतिनिधी रायगड, मुबई व ठाणे जिल्ह्यात घरफोडी करणार्या दोघांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) जेरबंद केले. शाकीर हैदर शेख (वय 42, रा. मुंब्रा) व अकबर नुरमहमद पटेल (वय 42 कणकवली) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून उघडकीस आलेल्या गुन्ह्यामधील …
Read More »रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्यावरील अतिक्रमणे उद्ध्वस्त
रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्यावर शासकीय जागेत अतिक्रमण करून उभारलेली कॅम्पेंज महसुल विभागाने जेसीपीच्या सहाय्याने उध्वस्त केली. या कारवाईचे स्वागत केले जात आहे. रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी शासकीय जागेत अतिक्रमण करून कॅम्पींग मार्फत पर्यटकांसाठी टेन्ट सुविधा केली होती. त्यात अनधिकृतपणे संडास, बाथरूम, चेजींग रूम बांधण्यात आले होते. तसेच …
Read More »पोलादपुरात लवकरच ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरण
डॉ. राजेश शिंदे यांची माहिती पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात आतापर्यंत निर्धारित शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांचे 70टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, लवकरच पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनाही कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांनी येथे दिली. कोविशिल्ड लसीकरणाची सुरूवात 9 फेब्रुवारीपासून झाली. पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203जणांना कोविशिल्ड लस …
Read More »पाली बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्यावर अन्याय होऊ देणार नाही
आमदार रवींद्र पाटील यांची ग्वाही पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली-बलाप-झाप या नियोजित बाह्यवळण (बायपास) रस्त्यासाठी प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरु केली असून, त्याला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. …
Read More »अलिबागच्या पांढर्या कांद्यांचा भाव वधारला; 200 रूपये माळ
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. त्याचा भाव सध्या वधारला आहे. लहान कांदा 180रुपये माळ तर मोठा कांदा 200रुपये माळ या दराने सध्या विकला जात आहे. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढर्या कांद्याचे पिक जास्त प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षी 240हेक्टरवर …
Read More »