Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड जिल्ह्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अलिबाग : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी  रायगड जिल्हा परिषदेला (राजिप)   चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11लाख 61हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला …

Read More »

थकीत रक्कम मिळाल्याने माथेरानच्या सफाई कामगारांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी थकीत मानधन मिळावे यासाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तब्बल नऊ दिवसांनी मागण्यांवर सन्मानजनक तोडगा निघाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माथेरान नगरपालिकेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषण मागे घेण्यासाठी नगर …

Read More »

माणगावमध्ये स्कूल बसची ट्रॅक्टरला धडक

माणगाव : प्रतिनिधी शहरातील टेंबेनाका येथे  बुधवारी (दि. 3) सकाळी  स्कुल बसने कचरा उचलणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात नगरपंचायतीच्या सफाई कामगाराला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.तर ट्रॅक्टरमधील दोन सफाई कामगार जखमी झाले. माणगाव नगरपंचायतीचे सफाई कामगार नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कचर्‍याच्या ट्रँक्टर (एमएच-11, जी-2796) सह शहरातील टेंबेनाका …

Read More »

बंद मोबाइल टॉवर शेतकर्यांसाठी डोकेदुखी

महाडमधील शेतकर्‍यांना महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाईची नोटीस महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाईल टॉवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाईल टॉवरकडून दंडवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याच्या नोटीसा शेतकर्‍यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टॉवर जागीच पडून राहिल्याने …

Read More »

युनियन बँकेचे पोलादपूर एटीएम सात महिने बंद

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील एकमेव युनियन बँकेच्या पोलादपूर शाखेतील एटीएम बंद होऊन तब्बल सात महिने झाले आहेत, मात्र ग्राहकांची गैरसोय आजतागायत सुरूच आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये बँकेने एटीएम सेवाशुल्कापोटी किमान साडेतीन हजार ग्राहकांचे प्रत्येकी 180 रुपयांपर्यंतची रक्कम परस्पर खात्यातून लांबविण्याचा प्रकार नियमित सुरू ठेवला आहे. पोलादपूर तालुक्यात 2009 सालापासून युनियन …

Read More »

रोहा पं. स. कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचार्यांचा धडक मोर्चा

धाटाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने रोहा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने उत्पन्न व वसुलीची अट घालणारा 27 एप्रिल 2020चा शासन निर्णय रद्द करणे, …

Read More »

खालापुरातील कचर्याची विल्हेवाट लावणार्या कारखान्याला ग्रामस्थांचा प्रखर विरोध

खालापूर : प्रतिनिधी मुंबईतील विविध रुग्णालयांतील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे एसएमएस नावाचा कारखाना येऊ घातला असून, त्याला आत्करगाव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगाववाडी, जंगमवाडी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोध दर्शविला. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक खासदारांना निवेदन दिले आहे. …

Read More »

माणगावमध्ये कलिंगड शेती यशस्वी

माणगाव : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, मात्र हवामानाच्या संकटावर मात करून माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी कलिंगडाचे यशस्वी पीक घेतले असून, शेतातील कलिंगड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. अवकाळी पाऊस, खराब हवामान आणि त्यातच कोरोना महामारीचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर मात करीत शेतकर्‍यांनी अपार कष्ट …

Read More »

खालापुरातील उंबरखिंडीत विजय दिन साजरा

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभूमी उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई आहे. या विजयी दिवशी छावणी येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, …

Read More »

गुरव समाज संघटनेकडून संदीप गुरवचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी थायलंडमध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस …

Read More »