सांबरकुंड धरणामुळे विस्थापित होणार्या शेतकर्यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी सांबरकुंड धरणाला आमचा विरोध नाही, आमची कुठलीही हरकत नाही. मात्र आमचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करा, अशी मागणी या धरणामुळे विस्थापित होणार्या शेतकर्यांनी जनसुनावणीमध्ये केली. अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत चाळीस वर्षांपुर्वी मंजूर झालेला सांबरकुंड धरण मध्यम प्रकल्प अद्याप रखडला होता. मात्र …
Read More »केंद्र सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करा!
पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन नागोठणे : प्रतिनिधी सर्वच क्षेत्रात महिला आता आघाडीवर आहेत. भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी आपल्या पाठीशी असणार्या महिलांना सबळ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या विविध योजना महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी शुक्रवारी (दि. 29) नागोठण्यात केले. …
Read More »पनवेल पंचायत समितीचा शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
अलिबाग ः प्रतिनिधीपनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांना शुक्रवारी (दि. 29) 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने ही धडक कारवाई केली.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश इंगोले यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. तेथे ते कार्यरतही झाले. बदलीच्या वेळी …
Read More »सेल्फीच्या नादात जीव गमावणार्या तरुणीस जीवदान
रेवदंडा : प्रतिनिधी साळाव पुलावरून सेल्फी काढत असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा तोल जाऊन पाय घसरून तरुणी साळाव पुलावरून कुंडलिका समुद्र खाडीत पडली. भरतीची वेळ असल्याने ती आग्रावकडे दिशेकडे वाहून गेली, सुदैवाने ती वाहून जात असतानाच आग्राव मधील कोळी बांधवाचे नजरेस आली, आणि तीचे प्राण वाचले. रेवदंडा पोलीस ठाणेमधील बडीकॉप महिला …
Read More »खैराची तस्करी करणारा ट्रक जप्त
पोलादपूर वनविभागाची कारवाई पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वनविभागाने शुक्रवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर खैराचे सोलीव ओंडक्यांची तस्करी करणारा एक ट्रक सुमारे पावणेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलादपूर वनविभागाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त बातमीवरून वन परिमंडल अधिकारी श्याम गुजर, दिलीप जंगम आणि …
Read More »माणगावात स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन
माणगाव : प्रतिनिधी मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत जोरकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रणपिसे क्लासेस्च्या विद्यार्थ्यांची गणिताची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर वाचनालयाचे …
Read More »माणगावजवळ भीषण अपघात; टेम्पोची एसटीला धडक
एक ठार, 21 जखमी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 10 किमी अंतरावर असणार्या नगरोली फाटा येथे गुरुवारी (दि. 28) सायंकाळी आयशर टेम्पोने एसटी बसला ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही वाहनांमधील 21 प्रवासी जखमी झाले. चालक अनंत मोतीराम वाघमारे (वय 40, रा. भाले आदिवासीवाडी, …
Read More »पेण पंचायत समिती कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचार्यांचा धडक मोर्चा
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा व पेण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 29) पेण पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने, उपोषणे तसेच ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देऊनसुध्दा सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याने अखेर ग्रामपंचायत कर्मचार्यांनी शुक्रवारी रामवाडी ते …
Read More »चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे आंदोलन
मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरुड : प्रतिनिधी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने मुरूड तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 29)काळ्या फिती लावून राज्यव्यापी आंदोलनाचे रितसर निवेदन तहसीलदार गमन गावित यांना दिले. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही …
Read More »रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे …
Read More »