Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजय क्षीरसागर

पेण : प्रतिनिधी माजीमंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांचे निष्ठावंत समर्थक अजय क्षिरसागर यांची पेण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. पक्षांतर्गत समझोत्यानुसार प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय सुरेश क्षिरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 13) …

Read More »

‘गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार’

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन कल्याणचे माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रभारी निवृत्ती पवार यांनी येथे दिले. वाशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गावविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचाराची आढावा बैठक …

Read More »

रायगडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नऊ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 15 पैकी नऊ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला. रायगड जिल्ह्यात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सण, उत्सव व समारं भाच्या निमित्ताने …

Read More »

मुबलक पाणी असूनही माथेरानमध्ये टंचाई

कर्जत : बातमीदार मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही गेले पाच दिवस माथेरानमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. एमजेपीच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. शारलोट तलाव व नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिसांचा रूट मार्च

कर्जत : बातमीदार तालुक्यात होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्यातील सर्व  अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची रूट मार्च काढण्यात आला. कर्जत तालुक्यातील दामत, पोशिर, साळोख तर्फे वरेडी, कोल्हारे, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, हुमगाव आदी नऊ …

Read More »

राज्य शासनाकडून डिझेल परतावा रखडला

  रायगडातील मच्छिमार आंदोलनाच्या तयारीत; जिल्हा मच्छिमार संघाच्या उपाध्यक्षांचा इशारा मुरूड : प्रतिनिधी दोन वर्षांपासून रखडलेले डिझेल परतावे शासनाने माच्छिमार सोसायट्यांना तातडीने द्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्याला 220 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला असून किनारपट्टीवरील …

Read More »

किनारा सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘सागर कवच’; मुरूडचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान

मुरूड : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियानाला सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले …

Read More »

महाबळेश्वरच्या कॅम्पसमधून निसटलेले दोन विद्यार्थी पोलादपूरमधून ताब्यात

पोलादपूर : प्रतिनिधी महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या कॅम्पसमधून निसटलेली दोन मुले सोमवारी (दि. 11) पहाटे पोलादपूर पोलिसांना शहरामध्ये संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्यांची आस्थापूर्वक माहिती घेऊन या दोन्हीही मुलांना पुन्हा कॅम्पस अधीक्षकांच्या ताब्यात देऊन पोलादपूर पोलिसांनी कर्तव्य बजावले. पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील गाडीतळ ते बँक ऑफ इंडिया कॉर्नर या रस्त्यावर सोमवारी …

Read More »

आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली गंभीर दखल

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आरकर यांच्याविरोधात  गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही त्यांना अटक केली जात नाही. या प्रकरणाची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाडमधील बिरवाडी कुंभारवाडा मोहल्ला येथील अब्दुल गफूर इब्राहिम आरकर यांचे …

Read More »

मृत कोंबड्यांचे मांस उघड्यावर टाकल्याने महड देवस्थान परिसरात दुर्गंधी

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील वरदविनायक देवस्थानच्या हद्दीत पाताळगंगा नदीकिनारी मृत पक्ष्यांचे मांस उघड्यावर टाकल्याने परिसरात दुर्गंधी येत असल्याची तक्रार महड ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार व नगरपंचायतीकडे केली आहे. बर्ड फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेता खालापुरातील शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून महड ग्रामस्थांची तक्रार येताच तलाठी रंजीत कवडे व त्यांचे सहकारी सुरेश …

Read More »