Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागोठणे विभागात महिलांचा भाजपकडे वाढता कल

महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान नागोठणे : प्रतिनिधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड येथील सरकारी विश्रांतीगृहात नुकतीच भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी नव्याने नियुक्त केलेल्या रोहे तालुक्यातील महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, …

Read More »

बिरवाडीच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या

प्रवीण दरेकर यांचे आवाहन महाड : प्रतिनिधी बिरवाडी ग्रामपंचायत आणि नागरी समस्या येथील प्रस्थापितांना सोडविता आल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्याप्रमाणे बिरवाडी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 11) बिरवाडी येथील प्रचार रॅलीदरम्यान केले. …

Read More »

‘बलिदानाचा संदेश’ तरुणांना प्रेरणादायी -वसंत कोळंबे

कर्जतमध्ये रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा कर्जत : बातमीदार सिध्दगडाच्या स्वातंत्र्य संग्रामवर आधारित ‘बलिदानाचा संदेश‘ हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणादायी असून सर्वांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक वसंत कोळंबे यांनी येथे केले.  ‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व …

Read More »

नेरळमध्ये तिथीप्रमाणे हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरमरण आले होते. नेरळमधील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये या हुतात्म्यांचा बलिदान दिन तिथी (मार्गशीर्ष एकादशी)प्रमाणे साजरा करण्यात आला. कोतवालवाडी येथील शहीद भवन येथे ट्रस्टच्या अध्यक्षा आणि जि. प. सदस्या अनसूया पादिर यांच्या हस्ते शनिवारी पहाटे सहा वाजून …

Read More »

तीन वाहनांना ठोकर देवून ट्रक दरीत कोसळला

बोरघाटातील अपघातात जीवित हानी नाही खालापूर : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने वाशी (नवी मुंबई) कडे जाणारा ट्रक बोरघाटात तीन वाहनांना ठोकर देवून 50 फुट  खोल दरीत कोसळला. ट्रक चालक व त्यांच्या साथीदाराने प्रसंगावधान दाखवून बाहेर उड्या मारल्याने त्या दोघांचा जीव वाचला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाच्या हद्दीत घडला. …

Read More »

हजारो कोंबड्यांचे प्राण वाचले

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत युद्धपातळीवर लसीकरण पाली : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांमधील कोंबड्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सरपंच उमेश यादव आणि व दुग्ध व्यावसायिक दत्ता इंदुलकर यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्पर्धा विश्व अॅकॅडमीमध्ये अभिवादन

अलिबाग : रामप्रहर वृत्त येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

बेकायदेशीर वाळू उपशाने नागोठणेतील शेतकरी संतप्त

जिल्हाधिकार्‍यांचे वेधणार लक्ष नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीच्या जांभूळटेप भागातील खाडीतून बेकायदेशीररित्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे खारबंदिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात येते व शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिराचंद गदमले, दामोदर भोईर, किरण भोईर, महादेव भोईर, लहू भोईर, केशव भोईर, कल्पेश भोईर …

Read More »

द्रुतगती महामार्गावर बसला अपघात

12 प्रवासी जखमी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने एका खाजगी प्रवासी बसने रविवारी (दि. 10) पहाटे ट्रकला जोरदार धडक दिली. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ‘वैभव ट्रॅव्हल्स‘ ची …

Read More »

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

मुरूड ः प्रतिनिधीमुरूड पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. अशा वेळी 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना ती मान्य नसल्याने बोट मालक-चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी पर्यटकांना किल्ला न बघताच …

Read More »