खालापूर : अरुण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात प्रमाण कमी व्हावे, याकरता महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या विशिष्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याने 2020या वर्षामध्ये या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण 50 टक्क्याने घटले आहे. राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार …
Read More »बनावट एटीएम कार्डद्वारे 54 हजार लांबविले
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील पालखार येथील फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने 54 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. पालखार येथील फिर्यादीचे बँक ऑफ इंडियाच्या गडब शाखेत बचत खाते असून या खात्याचे फिर्यादीकडे एटीएम डेबिटकार्ड आहे. या खात्यामध्ये 53 हजार 515 रूपये रक्कम शिल्लक होते. …
Read More »माणगावात वाहतूक पोलिसाला मारहाण : 18 आरोपींना अटक
माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकाणी कारवाई केल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक संतोष शिर्के, विकास मोरे, राजेंद्र मोरे यांच्यासह सुमारे 60 ते 70जणांनी वाहतूक पोलीस निवास साबळे यांना सोमवारी (दि. 4) सायंकाळी 5.30. वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ व मारहाण केली. माणगाव निजामपुर रोडवरील अमित कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या या घटनेत वाहतूक पोलीस …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कर्जत तालुक्यात 89 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात; हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध
कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 15जानेवारीरोजी होत आहे. नऊ ग्रामपंचायतीमधील सदस्यपदाच्या 89जागांसाठी 164उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर पाच ग्रामपंचायतीलमधील 17 जागा बिनविरोध झाल्या असून त्यांची अधिकृत घोषणा 18 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणूका होत असेलेल्या कर्जत तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी सुरुवातीला 297 नामांकन …
Read More »रायगडातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध
848 उमेदवारांची माघार, 1588 जण निवडणुकीच्या रिंगणात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्या 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीपैकी 10 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 78 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण 848 उमेदवारांनी माघार घेतली असून, 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावले; माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपले; महाड तालुक्यातील …
Read More »70 दिव्यांगांकडून ‘कळसूबाई’ सर
नववर्षाचे अनोखे स्वागत कर्जत : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहचून राज्याच्या 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांगांनी नववर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने केले. यामध्ये कर्जत येथील एका दिव्यांगाचा समावेश होता. अनेकांनी फक्त शिक्षण घेताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची मोहीम 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. …
Read More »‘उद्दिष्ट ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल’
खोपोलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन खालापूर : प्रतिनिधी पोलीस भरतीसाठी पैसा किंवा हुशारी लागत नसून कठीण परिश्रमाची गरज आहे. त्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसपवर वेळ न घालविता चांगले विचार ठेवा उद्दिष्ट ठरवा, यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी शनिवार (दि.2) येथे केले. पोलीस भरतीसाठी मोफत …
Read More »रोह्यातील भातसईला अनियमित पाणीपुरवठा
ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन रोहे : प्रतिनिधी तालुक्याच्या पश्चिम विभागातील 26गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संबंधीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी रोहा तालुक्यातील भातसई ग्रामस्थांनी तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोहा तालुक्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा …
Read More »पेण खारेपाटातील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश
आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली तातडीची बैठक चार दिवसांत जलवाहिनी पूर्ववत करून देण्याचे कंपनी अधिकार्यांचे आश्वासन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट विभागासह कासू, गडब विभागातील सर्वच गावांना गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. या भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी येथील संतप्त महिलांनी सोमवारी …
Read More »‘जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवा’; पेणमधील 54 गावांसाठी 60 कोटी 78 लाखांचा निधी मंजूर
पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत पेण तालुक्यातील 54 गावांमध्ये राबविण्यात येणार्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी 78 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रभावीपणे ही योजना राबवावी, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रविवारी (दि. …
Read More »