अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्यांना दोन महिने वेतन मिळाले नाही. एका कर्मचार्याने आत्महत्या केली. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अलिबाग एसटी आगारात आंदोलन केले. या वेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका सरचिटणीस प्रदीप पुनकर, निलेश महाडिक, सुनिल दामले व इतर …
Read More »आदिवासींना धान्य वाटप
स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनची दिवाळी भेट कर्जत : बातमीदार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील वारे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील सुमारे 70कुटुंबाना धान्य आणि मास्कचे वाटप करण्यात आले. करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमध्ये एकूण 70 कुटुंबे आहेत. …
Read More »दीपावलीसाठी रोहा बाजारपेठ सजली
कोरोनाच्या सावटामुळे तेजी नाही रोहे : प्रतिनिधी येथील बाजारपेठ दीपावलीच्या साहित्याने सजली आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असली तरी या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत तेजी नसल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोहा बाजारपेठेतील दुकाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्यांनी सजली आहेत. बाजारपेठेतील दुकाने आकाश कंदील, विद्युत तोरणे, फटाके आदी …
Read More »नाभिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश मोरे
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची सभा सोमवारी (दि. 9) जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाकण येथील हॉटेल बाळाराम येथे झाली. या बैठकीत महाडचे दिनेश मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीसुध्दा निवड करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोपान मोहिते (रोहा), उपाध्यक्ष विनोद पवार (उरण), मोहन चव्हाण …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस आजन्म कारावास
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन आणि तिला धमकावून तिच्यावर सहा वर्षे बलात्कार करणार्या आरोपीला येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर (रा. रेवस कोळीवाडा, ता. अलिबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही …
Read More »कंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळी
थकीत देयके न दिल्यास काम बंद आंदोलन पाली : प्रतिनिधी कंत्राटदारांची थकीत देयके दिवाळीपूर्वी अदा केली नाही तर 25 नोव्हेंबरपासून स्थानिकस्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व संबंधित …
Read More »राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांची पिळवणूक थांबवावी!; अन्यथा जनआंदोलनाचा भाजपचा इशारा
मुरूड ः प्रतिनिधी एसटी महामंडळातील चालक-वाहक, तांत्रिक विभाग, लिपिक आदी सर्व घटकाला मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वृंदांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोलीचे भाडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. सर्वांत कमी पगार एसटीमधील कर्मचार्यांना दिला जातो. त्यातच तीन महिने पगार नसल्याने कुटुंबाची …
Read More »ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा
महाड एसटी स्थानकात भाजपचे आंदोलन महाड : प्रतिनिधी – पगाराविना आर्थिक विवंचनेत एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या आत्महत्येस राज्यातील ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत महाड भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 10) येथील एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत उत्तम सेवा …
Read More »अर्णब गोस्वामी यांच्या भवितव्यासंदर्भात अलिबाग सत्र न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी
अलिबाग : प्रतिनिधीअलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज सोमवारी (दि. 9) उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने दिवसभराचे काम सायंकाळी उशिरा स्थगित केल्याने या संदर्भात मंगळवारी (दि. 10) पुन्हा सुनावणी …
Read More »शैक्षणिक फी कमी करा; रोह्यातील राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन
रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, अशी मागणी करीत सोमवारी (दि. 9) सकाळी येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांनी निवेदन दिले. स्कूलच्यावतीने हे निवेदन गणेश पवार यांनी स्वीकारले. सरकारचे 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय फीबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसताना रोहे …
Read More »