भाजपच्या उमाताई खापरे यांचे प्रतिपादन; दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक माणगाव : प्रतिनिधी पद हे शोभेसाठी घेवू नये तर संघटनेचे पद घेतले तर प्रत्येकाने संघटनेसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी माणगाव येथे मार्गदर्शन करताना सांगितले. दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा …
Read More »खोपोलीजवळ केमिकल कंपनीत स्फोट; दोन ठार, आठ जण जखमी
खालापूर : प्रतिनिधी खोपोलीजवळील ढेकू औद्योगिक क्षेत्रातील साजगाव येथील जेसनोवा फार्मसिटिकल अॅण्ड स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीत गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील ढेकू आर्कोस औद्योगिक प्रिमायसेसमधील जेसनोवा कंपनीत मध्यरात्री 2.30च्या …
Read More »माथेरानच्या राणीचा पर्यटन हंगाम सुरू
कर्जत : बातमीदार पर्यटकांची लाडकी मिनिट्रेन गुरुवार (दि. 4)पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली, मात्र नेरळ-माथेरान प्रवासाला सहा तास लागल्याने मिनिट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांचा पुरता हिरमोड झाला. दुपारी सव्वा वाजता पोहचलेल्या मिनिट्रेनने माथेरान-अमन लॉजदरम्यान 79 प्रवासी पर्यटकांना सोबत घेऊन पर्यटन हंगामाची सुरुवात केली. कोविड अनलॉकमध्ये मिनिट्रेनची प्रवासी सेवा सुरू झाली …
Read More »अर्णब गोस्वामी यांना अटक; भाजपची निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी (दि. 4) मुंबईतून अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ अलिबाग येथे भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अन्वय नाईक व त्यांच्या आईचा मृतदेह 4 मे …
Read More »पेणमध्ये मूर्तीकार व निराधार महिलांना धान्य वाटप
मेकिंग द डिफरन्स संस्थेचा उपक्रम पेण : प्रतिनिधी मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात सुरू असून लॉकडाऊन व चक्रीवादळ या संकटामुळे मूर्तिकार व कामगार यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करताना वेगळेच समाधान मिळत आहे. संस्थेतर्फे यापुढेही या परिसरात अशीच मदत केली जाईल, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मा यांनी …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
हेल्पींगहॅन्ड सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील चाहुचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कल्याण येथील हेलपिंगहॅन्ड या सामाजिक संस्थे तर्फे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांनी हेलपिंगहॅन्ड या संस्थेशी संपर्क करून चाहुचीवाडी शाळेतील पहिली ते पाचवीच्या …
Read More »नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बुधवारपासून बेमुदत उपोषण
कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ-कळंब रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचे काम करणार्या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे बुधवार (दि. 11) पासून बेमुदत उपोषण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी नेरळ-कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण …
Read More »स्वदेस फाऊंडेशनतर्फे शेळी संचाचे वाटप
पाली : प्रतिनिधी स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव विकास समिती मार्फत नुकतेच पाली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुधागड तालुक्यामधील 15 गावातील 26 आदिवासी बांधव व शेतकर्यांना शेळी संचाचे वाटप करण्यात आले. उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्या व प्रथमोपचार साहित्य यांचा या शेळी संचात समावेश असून, बाजार भावाप्रमाणे प्रत्येक संचाची किंमत 19हजार रुपये इतकी …
Read More »निधीअभावी रस्त्याचे काम रखडले
साळाव ते आगरदांडा राज्यमार्ग गेला खड्ड्यात मुरूड : प्रतिनिधी मुरुड हा पर्यटन तालुका आहे. मात्र राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी प्राप्त होत नसल्याने मुंबईला जोडणार्या साळाव ते आगरदांडा या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचा त्रास स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा सहन करावा लागत आहे. साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी राज्यमार्ग योजनेअंतर्गत सात …
Read More »ओबीसी समाजाकडून आरक्षणासाठी तहसीलसमोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी ओबीसी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण बचाव करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 3) जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी बांधवानी एकत्रित येऊन आंदोलन करून निदर्शने केली. रायगड जिल्ह्यातही ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्व 15 तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात …
Read More »