मुरूड ः प्रतिनिधी – मुंबईतील सहा जणांचा पर्यटक ग्रुप शनिवारी (दि. 7) काशिद बीचवर फिरायला आला असता त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते समुद्रात उतरले तेव्हा ओहोटीची वेळ सुरू होती. त्यातील दोघे पोहताना खोल समुद्रात खेचले गेले. या वेळी तेथे उपस्थित जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक …
Read More »पो. नि. अशोक थोरात यांनी स्वीकारला पदभार
रेवदंडा ः प्रतिनिधी – रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांची पुणे शहरामध्ये नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी इन्चार्ज म्हणून पो. नि. अशोक थोरात यांनी पदभार स्वीकारला. रेवदंडा पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पो.नि. अशोक थोरात हे यापूर्वी मुंबईतील भांडूप पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महाराष्ट्र पोलीस सेवेतील …
Read More »राज्यमार्गावर वृक्षांची कत्तल
व्यवसायासाठी हिरवाई सुकविण्याची शक्कल; संबंधित विभागांचेही दुर्लक्ष कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा श्री सदस्यांनी हिरवाई फुलविली, मात्र कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आता तीच हिरवाई आपले व्यवसाय सुरू करणार्यांना त्रासदायक ठरत आहे. हिरवीगार झाडे सुकविण्याची अनोखी शक्कल लढवली जात असून कर्जत-कल्याण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढले …
Read More »चोरीस गेलेली सायकल दोन तासांत केली परत
माणगाव : प्रतिनिधी येथील डॉ. मोहन दोशी यांची सुमारे तीस हजार रुपये किमतीची फायर फॉक्स ही सायकल चोरीस गेली होती. वाहतूक पोलीस रावसाहेब कोळेकर यांच्या प्रयत्नामुळे चोरीस गेलेली सायकाल दोन तासात परत मिळाली. डॉ. दोशी यांनी माणगाव एसटी स्टॅण्डसमोरील आपल्या दवाखान्याबाहेर फायर फॉक्स सायकल उभी केली होती. स्टॉलवरुन पेपर घेऊन …
Read More »आदिवासी भागातील जनावरांची तपासणी
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रिलायन्स फाउंडेशन आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील शिलार गावात जनावरांसाठी तपासणी व लसीकरण शिबीर घेण्यात आले. या वेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद साळोखे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात जनावरांना लाळ्या, खरतुक रोगाचे लसीकरण करून …
Read More »म्हसळ्यातील फर्निचर कारखान्याला आग
80 हजारांची सामग्री जळून खाक म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा-दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील सुमारे 80 हजार किमतीचे लाकडी सामान जळून खाक झाले. म्हसळा-दिघी रस्त्यावर नथुराम कदम यांचा विविध लाकडी वस्तू बनविण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा
कर्जतच्या लोभेवाडी, ऐनाचीवाडीतील उच्चशिक्षित तरुणांचा उपक्रम कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी उच्च शिक्षित आदिवासी तरुणांनी लोभेवाडीमध्ये रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम सुरू केला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र असे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसल्याने …
Read More »भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर
जिल्हा उपाध्यक्षपदी निलीमा भोसले यांची नियुक्ती महाड : प्रतिनिधी भाजपची रायगड जिल्हा महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर झाली असुन भाजपचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कै. राजेय भोसले यांच्या पत्नी निलीमा राजेय भोसले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी ही कार्यकारिणी जाहिर केली. दरम्यान, …
Read More »आर्थिक नैराश्येत कर्जत येथील तरुणाची आत्महत्या
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भडवळ गावातील एका 24 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय कनोजे असे या तरुणाचे नाव आहे. आठ महिने रोजगार नसल्याने आपले आयुष्य संपवून टाकले आहे. नेरळ जवळील भडवळ गावातील सुभाषनगर येथील 24 वर्षीय तरुण अक्षय चंद्रकांत कनोजे या तरुणाने शुक्रवारी (दि. 6) …
Read More »रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांमुळे मॉर्निंगवॉक करणार्यांमध्ये भिती
रेवदंडा : प्रतिनिधी थंडीच्या चाहूल लागताच, मॉर्निगवॉकवाल्यांनी सुध्दा रेवदंडा समुद्र किनारी गर्दी होऊ लागली आहे, परंतू समुद्र किनारी भटक्या कुत्री मोठ्या प्रमाणात असून त्याचा वाढता उपद्रव मॉर्निंगवॉकसाठी येणार्यांसाठी भितीचा ठरतो आहे. रेवदंडा समुद्र किनारी भटक्या कुत्रांचा मोठा ससेमिरा सुरू आहे, अनेक भटकी कुत्री समुद्र किनारी गर्दीने फिरत आहेत, सकाळी मॉर्निगवॉक …
Read More »