Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापूर परिसरात माती उत्खनन सुरूच; महसूल विभाग अंधारात

प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी खालापूर : प्रतिनिधी शासनाची कोट्यवधीची रॉयल्टी बुडवून सुरू असलेल्या माती उत्खनन आणि वाहतुकीला दोन ठेकेदारांच्या भांडणांमुळे वाचा फुटली असून तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी मात्र धृतराष्ट्राच्या भुमिकेत आहेत. तसेच या परिसरातील अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरू असून महसूल विभाग मात्र अंधारात आहे. तालुक्यातील वावोशी …

Read More »

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी मतदान

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी राजकीय पक्ष तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक, तर नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यावरून पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू

कर्जत ः प्रतिनिधी माथेरानमध्ये घोड्यावरून पडून जखमी झालेल्या पर्यटकाचा शनिवारी (दि. 28) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद काशीद इम्तियाज शेख असे या पर्यटकाचे नाव असून तो मुंबईचा राहणारा होता. मोहम्मद शेख, त्यांची पत्नी व मित्र असे चार जण 25 जानेवारीला माथेरानमध्ये फिरावयास आले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते घोडेस्वारीसाठी तेथील हार्ट …

Read More »

ऐन थंडीत पृथ्वीच्या उदरातून गरम पाणी

उन्हेरे कुंडावर स्नानासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळ असलेल्या कुंडामध्ये ऐन गुलाबी थंडीत गरम पाणी पृथ्वीच्या उदरातून येत असून हा निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी, तसेच स्नान करण्याकरिता सध्या या ठिकाणी स्थानिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला …

Read More »

खालापुरात ठाकरे गटाला गळती सुरूच; शिवसैनिक करणार भाजपत प्रवेश !

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची पडझड थांबायचे नाव घेत नसून 31 जानेवारीला चौक जिल्हा परिषद विभागातून चौक, बोरगाव ग्रामपंचायत सरपंचांसह हजारो कार्यकर्ते ‘शिवबंधन’ तोडून ‘कमळ’ हाती घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश …

Read More »

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार!

कोकण शिक्षक मतदारसंघात महायुतीची एकजूट अलिबाग : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीने एकजुटीने आपली ताकद लावली असून महाविकास आघाडीविरोधात आव्हान उभे केले आहे. राज्य विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या …

Read More »

खालापूरातील कलोते येथे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची नोटीस

खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत शेतजमीनीतून शासनाचा महसूल बुडवून दगड मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते याबाबत तलाठी सजा वावंढळ यांनी पंचनामा करून पाचपट दंडाची नोटीस पाठवली आहे . खालापूर तालुक्यात  सध्या गृहप्रकल्प, रस्ते तसेच औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आणि मातीला सोन्याचा भाव आला आहे. बांधकामासाठी डबर आणि भरावासाठी मातीची …

Read More »

माथेरान घाटात कारचा अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली कर्जत : प्रतिनिधी माथेरानला जातानाच घाट रस्त्यात अपघात होऊन त्यांच्या रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे. यात दोघेही बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विरार येथील विजय उपाध्ये व आशिष चतुर्वेदी या दोन मित्रांनी माथेरान …

Read More »

धुळीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळणार!

माथेरानच्या व्यापारी वर्गात समाधान; क्ले पेव्हर ब्लॉक रस्ता काम युध्दपातळीवर माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमध्ये धूळ विरहित रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा याकामी सनियंत्रण समितीच्या परवानगीने एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे सध्यातरी युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामामुळे माथेरानच्या व्यापारी, नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कामामुळे धुळीच्या …

Read More »

श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर

रेवदंडा : प्रतिनिधी राजस्थानमधील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल निरूपणकार श्री. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधी विद्यापिठाचे कुलपती डॉ. श्री. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी धर्माधिकारी यांना दिले. यापूर्वी या विद्यापिठाने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, …

Read More »