Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात 893 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) कोरोनाचे 893 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 659 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन तसेच खालापूर व अलिबाग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण …

Read More »

फ्रिज जळून फ्लॅटचे नुकसान

पोलादपूर : प्रतिनिधी शहरातील प्रभातनगर पूर्व भागातील ओम अपार्टमेंटच्या ए विंग मधील एका फ्लॅटच्या भाडेकरूच्या फ्रिजला शुक्रवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये किचनमधील सामान जळून खाक झाले. जागरूक सेवाभावी नागरिकांनी तातडीने ही आग विझविण्यात यश मिळविले असले तरी या घटनेने पोलादपूर शहरात नगरपंचायतीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. …

Read More »

मुरूडचे पर्यटन बहरतेय

घोडेस्वारीकडे पर्यटकांचा कल मुरूड ः प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कालवधीत सर्वत्र हॉटेल्स तसेच लॉजिंग रेस्टॉरंट्स गेली अनेक महिने बंद होती, परंतु आता संचारबंदीत शिथिलता आल्यानंतर तसेच ई-पास रद्द केल्यामुळे लोकांना सर्वत्र जाण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी आता पर्यटक हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. मुरूड येथे आता शनिवार-रविवारी पर्यटक दिसू लागले …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

रोह्यात विजेचा खेळखंडोबा

नागरिक त्रस्त; ऑनलाइन शिक्षणावर परिणाम रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नाही, वारा वादळ नाही तरी सतत वीज जात असल्याने वीज वितरणविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रोहा …

Read More »

माणकिवली-कडाव रस्त्याची स्वच्छता

तरुणांचे श्रमदान कर्जत ः बातमीदार  कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कडाव-मानकिवली भागात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढली होती. त्या अनुषंगाने सामाजिक कार्याची आवड असलेल्या ओमकार पवार या तरुणाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन माणकिवली-कडाव रस्त्यावर वाढलेली जंगली झाडेझुडपे काढून टाकली.   कडाव-माणकिवली रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात जंगली झाडेझुडपे वाढली होती. त्याचा …

Read More »

ढिसाळ आरोग्य यंत्रणेबाबत भाजप आक्रमक

पदाधिकार्‍यांनी घेतली डॉ. बनसोडे यांची भेट कडाव ः वार्ताहर  कर्जतमधील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार व रुग्णसेवेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणेचा संतोष पवारसारखा एक अभ्यासू पत्रकार बळी ठरल्याचे समोर आले आहे. या पाशर्वभूमीवर कर्जत भाजपने आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्यासाठी थेट कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बनसोडे यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी …

Read More »

आरोपीला पीडितांचा घेराव; महाड इमारत दुर्घटना

महाड ः प्रतिनिधी महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपीला न्यायालयातून नेताना पीडितांनी गाडी अडवून आरोपीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत घेराव घातला. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दुर्घटनेस जबाबदार असलेला बिल्डर फारुक काझीला अटक करण्यात आली. …

Read More »

फुटपाथवरील व्यावसायिकांना आता मिळणार तत्काळ कर्ज

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा आधार कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने बाहेर जाऊन रोजगार मिळविता आला नाही. त्याच वेळी फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना …

Read More »

रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील …

Read More »