Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत पंचायत समितीला आली जाग!शिवरायांसह हुतात्म्यांच्या पुतळ्यांचे होणार सुशोभीकरण; ‘राम प्रहर’चा दणका

कर्जत ः बातमीदार कर्जत पंचायत समिती कार्यालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे पुतळे अंधारात, जमिनीवर पाणी असलेल्या जागी आणि आजूबाजूच्या भिंती काळपट अशा स्थितीत होते. दरम्यान, तालुक्यातून याबाबत सर्वांनी आवाज उठविल्याने कर्जत पंचायत समिती खडबडून जागी झाली आणि त्यांनी परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात भातशेती बहरली

श्रीवर्धन : प्रतिनिधी यावर्षी पावसाची सुरुवात 3 जून रोजीच झाली. तीन जून रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले व या चक्रीवादळाच्या सोबतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जून महिन्याच्या आठ तारखेपासून नियमित पणे मोसमी पाऊस पडू लागला. शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र निघाल्यावर पेरलेले भात चक्रीवादळाच्या वेळी पडलेल्या पावसामुळे शेतात उगवले होते …

Read More »

तीन पत्रकारांना खालापुरात अटक; मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

खोपोली : प्रतिनिधी अर्णव गोस्वामी संपादक असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह व प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. …

Read More »

नागोठणे टपाल कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त

भाजपकडून निवेदन नागोठणे : प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी (दि. 9) निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी बातमीदार माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र न्यूज 24चे संपादक संतोष पवार (वय 54) यांचे बुधवारी (दि. 9) सकाळच्या सुमारास वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. संतोष पवार यांची रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून ओळख होती. रायगड प्रेस क्लबचे …

Read More »

राजिपची सभा काही मिनिटांतच आटोपली; व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उडाला सावळागोंधळ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. 9) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन सभेत तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे गोंधळ उडाला. या वेळी सदस्यांचा अधिकार्‍यांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ही सभा काही मिनिटांमध्येच आटोपण्यात आली. राजिपची अर्थसंकल्पीय सभा 11 मार्च 2020 रोजी झाली होती. त्यानंतर 10 जून रोजी सभा आयोजित करण्यात आली …

Read More »

रायगड जिल्ह्यात तब्बल 963 रुग्णांचा नवा उच्चांक

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) आजवरच्या सर्वाधिक 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्णांचा कोविड-19मुळे बळी गेला आहे. दुसरीकडे दिवसभरात 436 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 372, अलिबाग 206, पेण 115, खालापूर 40, उरण 27, रोहा 53, कर्जत 49, माणगाव …

Read More »

‘सवतकड्या’वर पर्यटकांचा ओघ; ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांची भटकंती

मुरूड ः प्रतिनिधी     मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध असलेला सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहे. उंच धबधबा व त्यातून उडणारे तुषार पर्यटकांना आकर्षित करतात. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरूडमध्ये आता पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने ठाणे व पनवेल येथील …

Read More »

‘कोमसाप’च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार

माणगाव ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20करिता तालुक्यातील गुणवंत शिक्षक म्हणून मुकेश रमेश भोस्तेकर आणि संगीता व्यंकट सुरशेट्टे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी शाखेच्या वतीने जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांच्या सूचनेनुसार गुणवंत …

Read More »

शिवरायांसह हुतात्म्यांची अवहेलना; कर्जत पं.स.कार्यालयात पुतळे फाटक्या छपराखाली व अंधारात

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याची अस्मिता समजले जाणारे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील तसेच देशाची अस्मिता समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यांची कर्जत पंचायत समिती कार्यालयात परवड सुरू आहे. पंचायत समितीच्या दुमजली कार्यालयात प्रवेश केल्यावर एका बंद खोलीत हे पुतळे असून, त्या खोलीचे छप्पर फाटून काळपट पडले आहे. …

Read More »