पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा आधार कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने बाहेर जाऊन रोजगार मिळविता आला नाही. त्याच वेळी फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना …
Read More »रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील …
Read More »भातशेतीला झोडपल्याने शेतकरी हवालदिल
कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीच्या पावसाचा तडाखा माणगाव : प्रतिनिधीखरीप हंगामातील भातशेती सध्या कापणीस तयार होत आहे. कोरोना साथीच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत, मात्र परतीचा पाऊस भातशेतीला झोडपून काढत असून, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्यांना आता परतीच्या पावसाचा फटका …
Read More »पेणमध्ये कृषी कार्यानुभव कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील …
Read More »माणगावमधील कोस्ते ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावात भरपावसात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोस्ते गाव पावसाळ्यातही तहानलेले आहे. सरकारी अधिकार्यांकडे गार्हाणे …
Read More »पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
कर्जत : बातमीदार ऑक्सिजन सिलिंडर बदलताना झालेल्या चुकीमुळे या सिलिंडरचा स्फोट झाला आणि ऑक्सिजनअभावी पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस शासनाची आरोग्य यंत्रणा जबाबदार असून, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पवार कुटुंबीय तसेच सहकारी पत्रकार यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे …
Read More »मुरूडच्या नागरिकांची गांधीगिरी
सतत बत्ती गूल होत असल्याने अभियंत्याचा सत्कार मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्याला स्विचिंग सेंटर प्राप्त होऊनसुद्धा वीजपुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांनी एकत्र येत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांचा गांधीगिरी करीत सत्कार केला. मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश भगत यांच्या हस्ते शाल व …
Read More »पोलादपूर तालुक्यात सर्पदंशाने मुलाचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधीपोलादपूर तालुक्यातील काळवली येथील एका मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 10) रात्री घडली. प्रतिक प्रमोद महाडिक (वय 14) असे या मुलाचे नाव आहे. काळवली येथील प्रतिक महाडिक हा मुलगा घरात झोपला असता, गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याला मण्यार सापाने दंश केला. पालक व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर …
Read More »रायगड जिल्ह्यात पाहणी दौरा
चक्रीवादळात झालेल्या नुकसान व कार्यवाहीचा केंद्रीय पथकाकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा गुरुवारी (दि. 10) केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला. पाहणी दौर्यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. रायगड व …
Read More »सुधागड बनलेय कोरोनाचा हॉटस्पॉट; रुग्णसंख्या 300पार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. सुधागडातील कोरोनाबाधितांची संख्या आता 300पार झाली आहे. सुधागड तालुक्यात कोरोनाचे तब्बल 302 रुग्ण झाले असून आतापर्यंत 182 रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला, तर …
Read More »