अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारलेली बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रो रो बोटसेवा येत्या गुरुवार (दि. 20)पासून सुरू होणार आहे. या बोटीतून मुंबईतील चाकरमान्यांना स्वतःचे वाहन घेऊन रायगड जिल्ह्यात येता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रो रो बोटसेवेचे 15 मार्च रोजी उद्घाटन करण्यात …
Read More »खालापूरजवळ कारचा अपघात; एक जण ठार, दोघे गंभीर जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावरून जाणार्या एका कारला खालापूर हद्दीत खडी मशीनजवळ अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 17) सकाळी घडली. जखमींना चौक आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त लोक माणगाव तालुक्यातील विळा येथील रहिवाशी असून, ते कारने पनवेलकडे जात होते. …
Read More »कोरोना रुग्णांच्या आकड्याची लपवाछपवी
खालापुरात शासकीय अहवालाहून प्रत्यक्ष रुग्णसंख्या अधिक खोपोली, खालापूर : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक संशयास्पद गोष्टी घडत आहेत. खालापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्यक्षात जास्त असूनही प्रशासनाकडून देण्यात येणारी आकडेवारी कमी दाखवली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा चौदाशेकडे वाटचाल करीत आहे, तर 47 जणांचा बळी गेला …
Read More »मासेमारी नौका अद्यापही बंदरातच; मच्छीमारांचा नव्या हंगामाचा मुहूर्त लांबला
अलिबाग : प्रतिनिधी मच्छीमारांसमोरील विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत. नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सरसावलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना वादळी हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे. यामुळे मासेमारीवरील दोन महिन्यांचा शासकीय बंदी कालावधी संपून अर्धा महिना उलटला तरी मासेमारी नौका …
Read More »भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी परशुराम म्हसे
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कर्जत तालुका मंडल कार्यालयीन प्रमुख आणि प्रगतशील शेतकरी परशुराम म्हसे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते म्हसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावर तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. कर्जत तालुक्यातील खैरपाडा …
Read More »रिलायन्स पाइपलाइनबाधित प्रकल्पग्रस्त करणार उपोषण; भाजपचा पाठिंबा
कर्जत : बातमीदार रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पापोटी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांना त्यांनी दिलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी रिलायन्स कंपनी आणि प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने या प्रकल्पग्रस्तांनी येत्या बुधवारी (दि. 19) कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »घराच्या छताचे प्लास्टर कोसळले
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये सध्या घरातील छत पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी (दि. 16) सीबीडी बेलापूर सेक्टर 4 या इमारतीतील ग बी, 10/11/4:1 या घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नसली तरी कुटुंबातील व्यक्ती थोडक्यात बचवल्या. मात्र यामुळे फर्निचरचे किरकोळ …
Read More »तांबडी घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा! अन्यथा अधिवेशन काळात मोर्चा काढणार; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा
रोहे : प्रतिनिधी मराठा समाजाच्या समन्वयकांनी रविवारी (दि. 16) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अत्याचारात बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची दुसर्यांदा भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांनी या घटनेत न्याय मिळवून देण्यासाठी समस्त मराठा समाज एकवटला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी; अन्यथा येत्या अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा …
Read More »गणेशोत्सवात अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
अलिबाग ः प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत …
Read More »कोरोना चाचणी प्रयोगशाळेची रायगडकरांना अद्यापही प्रतीक्षा
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात एप्रिल अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अलिबाग येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. स्वातंत्र्यदिनी ही प्रयोगशाळा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, मात्र ही प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे रायगडकरांना कोरोना चाचणीसाठी मुंबई किंवा नवी मुंबईतील …
Read More »