Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

होराळे येथील तरुणाचा अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील होराळे गावातील पंकज दळवी (25) या तरुणाचा बुधवारी रात्री एका स्कॉर्पिओ गाडीत मृतदेह आढळून आला. आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेलेल्या पंकजचा मृत्यू आणि तोही फिरायला गेलेल्या गाडीत झाल्याने अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. दारू पिऊन टोकाच्या वादातून की अन्य कोणत्या कारणास्तव पंकजचा मृत्यू झाला, …

Read More »

कापड उद्योग थंडावला; कामगारांना लॉकडाऊनचा फटका; तयार माल विक्रीविना पडून

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पोखरकरवाडीत स्थानिक युवक कापड व्यवसाय करीत आहेत, मात्र लॉकडाऊन काळात त्या 32 तरुणांचा व्यवसाय हिरावला गेला आहे. गणेशोत्सवावर आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाकडून गणेशोत्सवासाठी लागणार्‍या स्टेज डेकोरेशनची जेमतेम 25 टक्केच खरेदी झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कर्जत तालुक्यातील कापड व्यवसायातील बेरोजगारी वाढू लागली असून काम करणार्‍या कारागीरांना …

Read More »

एसटी सेवा सुरू करण्यासाठी ‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी गावागावात एसटी सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 12) डफली बजाव आंदोलन करण्यात आले. अलिबागमध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडक उपस्थितीत हे आंदोलन झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह जिल्ह्यातील आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. …

Read More »

ना ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, ना शोर… मुसळधार पाऊस असूनही गोपाळकाला यंदा सुना सुना!

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनामुळे पारंपरिक सणांवर पाणी फेरले जात आहे. गोपाळकालाही त्याला अपवाद ठरला नाही. ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा…अशी वातावरणनिर्मिती करणारी गीते बुधवारी (दि. 12) कानावर पडली नाहीत. गोविंदांचे फिरणारे जत्थे हे चित्रही कुठे पाहायला मिळाले नाही. मंगळवारचा श्रीकृष्ण जन्मोत्सवही अगदी साधेपणात साजरा झाला. मंदिरात आणि …

Read More »

पोलादपूरमध्ये पारंपरिक पध्दतीने गोपाळकाला साजरा

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडया फोडण्याचे एक नियमबध्द नियोजन करण्यात आले असून दरवर्षी या नियोजनानुसारच दहीहंडी फोडण्याची संधी शहरातील 12 नगरांना देण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व. सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत …

Read More »

रेवदंडा-रोहा रस्त्यातील खड्ड्यांची आठ दिवसांत डागडुजी करा

भाजप रोहा तालुका युवा मोर्चाची मागणी रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा-रोहा रस्त्यातील खड्डे आठ दिवसांत चांगल्या मटेरियलने भरून द्यावेत, असे निवेदन रोहा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्यास भाजपचे रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन गावडे यांनी दिले. रोहा-रेवदंडा रस्त्यावर चणेरा साळाव जेएसडब्लू कंपनीच्या अवजड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाली असून पारंगखारे चणेरा …

Read More »

ऐन सणासुदीत बत्ती गूल! व्यावसायिकांसह नागरिक त्रस्त; महावितरणविरोधात संताप

मुरूड : प्रतिनिधी सणासुदीच्या काळातही ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुरूड तालुक्यात तर किमान सहा तासांपेक्षा जास्त वेळ वीज नसल्याने व्यावसायिकांना आपला व्यवसाय करणे जिकिरीचे ठरत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना मूर्तिकारांचे काम हातघाईवर आले आहे, मात्र त्यांनाही विजेचे विघ्न त्रासदायक ठरत …

Read More »

कोरोनामुळे गोविंदांच्या उत्साहावर पाणी

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे यंदा गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव पूर्णपणे शांततेत पार पडला. शहरात यंदा मोठ्या हंडी बांधल्याच नसल्याने गोविंदांच्या उत्साहावर पाणी पडले. शहरात मंगळवारी रात्री 12 वाजता राधाकृष्ण मंदिर तसेच कानिफनाथ मठात श्रीकृष्ण जन्मसोहळाही काही निवडक भक्तांच्या उपस्थितीत उरकण्यात आला. प्रत्येक आळीतून निघणार्‍या गोविंदांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बंदी …

Read More »

पेणच्या प्रांताधिकारीपदी विठ्ठल इनामदारांची नियुक्ती

पेण ः प्रतिनिधी महाड येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची पेणच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पेणच्या विद्यमान प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची महाड येथे बदली झाली असून, त्या महाडच्या प्रांताधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.  मूळचे सांगली येथील विठ्ठल इनामदार यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे यापूर्वी काम केले आहे. त्याचप्रमाणे …

Read More »

नागरिकांच्या गर्दीने बँका फुलल्या

महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये मागील काही दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन दिवस सुटीचे गेल्याने सोमवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाल्याने शहरातील विविध बँकांमधून एकच गर्दी दिसून येत होती. या गर्दीचे शहरातील नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी झालेला नाही. …

Read More »