Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात 70 टक्के भातलावणी पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत 70 टक्के क्षेत्रावर भातलावणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते. विविध कारणांमुळे हे क्षेत्र एक लाख चार हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. यंदा कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार एक लाख हेक्टर …

Read More »

रेवदंड्यात जुगार्‍यांवर कारवाई

रेवदंडा : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हात लॉकडाऊन पुकारला असून संचारबंदीसुद्धा लागू आहे. तरीही रेवदंडा येथे घरमालकाच्या संमतीने जुगार अड्डा सुरू असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणी आठ जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रेवदंडा छोटे बंदर समुद्रालगतच्या नवीन वसाहतीमध्ये जितेंद्र नारायण म्हात्रे यांच्या घरी …

Read More »

दुधाला वाढीव दर, भुकटीला अनुदान द्या!; भाजपचे आंदोलन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार गायीच्या दुधाचा दर वाढवून मिळावा आणि दुधाच्या भुकटीला अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 20) एल्गार आंदोलन पुकारून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, तसेच मागणी मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. …

Read More »

लॉकडाऊन : रायगडात 65 जणांची आत्महत्या

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाची महामारी आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदी (लॉकडाऊन)चे आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचे मानसिक दुष्परिणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत 65 जणांनी आत्महत्या केली आहे, तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू …

Read More »

श्रावणात घन निळा बरसला…

बोर्ली पंचतन ः श्रावणाच्या आगमनाने निसर्गाचे नवचैतन्य सौंदर्य बहरून आले आहे. मुसळधार पडणार्‍या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र उनसावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. (छाया ः अमेय नाझरे)

Read More »

बेपत्ता नागरिकांमध्ये वाढ; सुधागडात चिंतेचे वातावरण

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अचानकपणे बेपत्ता होणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नंदीमाळ नाका येथील प्राजक्ता प्रदीप खाडे (32, मूळ राहणार रासळ, ता. सुधागड) ही महिला 9 जूनपासून पालीतून बेपत्ता झाली आहे. सदर महिला 9 जूनला सकाळी 9 वाजता पेण येथून पाली अडुळसे येथे जाण्याकरिता निघून 11 वाजता …

Read More »

दूध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी भाजप आक्रमक

अलिबाग ः प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (दि. 20) राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला होता. त्यानुसार भाजपने अलिबाग तालुका तहसीलदारांना दुधाची पिशवी देऊन आंदोलन केले.    अलिबाग तहसीलदारांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष …

Read More »

कृष्णा कोबनाक यांची सदस्यपदी नियुक्ती

माणगाव ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे म्हसळा तालुक्यातील शिवाजीनगर चाफेवाडी गावचे क्रियाशील कार्यकर्ते कृष्णा कोबनाक यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »

अॅसिडिटीवर करा घरगुती उपाय

आरोग्य प्रहर अ‍ॅसिडिटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अ‍ॅसिडिटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अ‍ॅसिडिटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात, पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. यावर काही …

Read More »

शासनाकडून निराधारांची उपेक्षा!

अपंग-विधवांना श्रावणबाळ पेन्शन योजनेची प्रतीक्षा कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारी अशासकीय समिती बनविण्यात आली नाही. परिणामी समिती नसल्याने लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करता आले नाहीत. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असलेल्या सभासदांना शासनाला श्रावणबाळ योजनेमधून मदत देता आली नाही. …

Read More »