Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोहा तालुक्यात 27 नवीन रुग्ण

रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात रविवारी 27 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. तर कोरोना संसर्गमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीतांची संख्या 337 वर पोहचली आहे. आतापर्यंत 269 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गमुळे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यात …

Read More »

स्फोटप्रकरणी कंपनीवर गुन्हा

खोपोली : प्रतिनिधी स्फोट होऊन दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी खोपोली येथील इंडिया स्टील कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया स्टील कारखान्यात 14 जुलैच्या मध्यरात्री प्रचंड स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. सिलिंडरचा हा स्फोट इतका प्रचंड होता की विहारी, सिद्धार्थनगर …

Read More »

रायगड जिल्ह्यात गटारी जोरदार साजरी; मटण, चिकन खरेदीसाठी रांगा; सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली

माणगाव : प्रतिनिधी श्रावण महिन्यापूर्वी येणार्‍या गटारी अमावस्येचा उत्साह खवय्यांमध्ये यंदाही दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन अंशतः शिथिल झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडत चिकन, मटण व अन्य मांसाहारी पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे दर वाढूनही लोकांनी खरेदीत कसर केली नाही, मात्र या वेळी काही ठिकाणी …

Read More »

कर्जतमध्ये जमावबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी; धबधबे, धरणे गजबजली

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील धबधबे, धरणे आणि पाणवठे यांसारख्या पर्यटनस्थळांवरील बंदी झुगारून पर्यटकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. या वेळी त्यांना कुणीच रोखले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईपासून जवळ असल्याने व उपनगरीय लोकलची सुविधा असल्याने कर्जत तालुक्यातील वर्षाकालीन पर्यटनस्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. येथे शनिवार-रविवारी पर्यटकांचे …

Read More »

हाहाकार! रायगडात 524 नवे रुग्ण; 17 जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एका दिवसातील सर्वाधिक 524 रुग्णांची रविवारी (दि. 19) नोंद झाली असून, 17 जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 181 (महापालिका 139 व ग्रामीण 42), पेण 92, खालापूर 82, अलिबाग 71, रोहा 27, उरण 18, कर्जत 16, माणगाव व महाड प्रत्येकी 11, म्हसळा …

Read More »

जेएनपीटी वसाहतीच्या रहिवासी घर भाड्यात दुपटीने वाढ

दरवाढ मागे घेण्याची कामगारांकडून मागणी उरण : प्रतिनिधी जेएनपीटी वसाहतीच्या गळक्या आणि नादुरुस्त निवासी इमारतींची दुरुस्ती न करताच 18 जुलैपासून प्रशासनाने रहिवासी व वाणिज्य वापर होणार्‍या इमारतींच्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. कोरोनाच्या संकटात रोजगारावर आधीच गदा आली असतानाच 17 वर्षांनंतर अचानक भरमसाठ करण्यात आलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी येथील …

Read More »

मासळीची आवक घटली

खवय्ये नाराज; मच्छीमारांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात पावसाळी हंगाम सुरू असल्याने व शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारी करण्यास प्रतिबंध असल्याने मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक घटली आहे. यांत्रिकी बोटींना समुद्रात जाण्यास मज्जाव असल्याने सध्या मुरूड समुद्र किनार्‍यावर पेर्‍याने पकडण्यात आलेली मासळी तसेच समुद्राच्या …

Read More »

काकडी विक्रीला लॉकडाऊनचा फटका

शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्‍यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्‍यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक  उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा …

Read More »

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या  रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये …

Read More »

कर्जतमध्ये चार ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार असून, त्यातील एका ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण …

Read More »