Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापुरात रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद

खालापूर ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी भाजप उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 1000 बॉटल्स रक्तदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने खालापूर …

Read More »

नुकसानग्रस्त बागायतदारांना भाजपकडून ऑटो कटरचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे कापण्यासाठी भाजपतर्फे बागायतदारांना  ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. उन्मळून पडलेली झाडे कापण्याचे सध्या बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे.  अशा वेळी भाजपकडून रविवारी विभागवार ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बागायतदारांना वाड्या साफ करणे सोपे होईल. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »

गृहनिर्माण सोसायट्यांमधील थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी

आमदार निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सहकारमंत्री …

Read More »

समाजमाध्यमांचा वापर करीत योग दिन साजरा

माणगाव ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या वर्षी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी घरीच योग दिन उत्साहात साजरा केला. प्रतिवर्षी योग दिनाचे औचित्य साधून शासकीय व सार्वजनिक संस्था विविध प्रकारचे कार्यक्रम व योग शिबिर आयोजित करतात. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कॉलेजेच बंद असून सार्वजनिक …

Read More »

प्रवाशांना रेल्वे तिकिटांचा परतावा

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन कर्जत ः बातमीदार – लॉकडाऊन काळात प्रवास करणार्‍या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत. त्या रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे आता परत केले जाणार होते. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळविण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर उपस्थिती दर्शविली होती. सुमारे 300 अर्जांद्वारे तिकिटे …

Read More »

खोपोलीत योग दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त रविवारी खोपोलीत विविध बंदिस्त सभागृहांत प्रस्तावित योगगुरूंनी योगाचे धडे दिले. दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आपापल्या इमारती व घरांतच योगसाधना करून नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. वर्तमान स्थितीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी व शारीरिक, मानसिक …

Read More »

पेणमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी उपाययोजनांची सुरुवात केल्याने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसला होता, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पेण बाजारपेठांमध्ये होऊ लागलेली गर्दी तसेच बाहेरील प्रवास करणारे नागरिक हे कोरोना संसर्गाचे माध्यम ठरत असल्याने जिल्ह्याबरोबर पेणमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत …

Read More »

रिलायन्स टाऊनशिप परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. परिणामी या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील बी-150मधील रूम नं. बी-149 ते बी-152 रूमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या …

Read More »

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

अलिबाग ः प्रतिनिधी सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चीनच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे. त्या अनुषंगाने अलिबागेतील चेंढरे येथे नागरिकांनी एकत्र येत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी नागरिकांच्या हातात चीनविरोधातील घोषणांचे फलक होते, तसेच भारतमाता की जय आणि चीनविरोधात …

Read More »

वादळाच्या तडाख्यातही पक्षी घरट्यातच

माणगाव ः प्रतिनिधी संकटांशी जिद्दीने सामना करण्याची पक्ष्यांची अनोखी पद्धत असून 3 जूनला रायगडात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात असेच एक निरीक्षण समोर आले आहे. हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे पशुपक्षी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड देत असल्याचे दिसून आले. निसर्ग चक्रीवादळाचे वारे ताशी 120 किमी वेगाने वाहत होते. या वादळात घरांचे, इमारतींचे व …

Read More »