Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागोठण्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आजपासून चार दिवस बाजारपेठ बंद

नागोठणे : प्रतिनिधीशहरासह विभागात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, दुसरीकडे गुरुवार ते रविवार असे चार दिवस येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. नागोठणे शहरातील एका 51 वर्षीय व्यक्तीसह बेणसे येथील 34 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. …

Read More »

पेणमध्ये 12 नवे कोरोना रुग्ण

पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोनाग्रस्त  रुग्णंच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी (दि.17) 12 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. पेणमधील नव्याने वाढलेल्या 12 रुग्णांमध्ये चार गडब, दोन वडगाव, एक बेणसे येथील असून पाच रुग्ण हे पेण नगररिषद हद्दीतील आहेत. यामुळे बुधवारी पेणमधील एकूण रुग्ण संख्या 44 झाली असून यामधील 20 …

Read More »

नाणोरेत आढळला कोरोनाबाधित रुग्ण

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे गावातील एका 62 वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला असून गेल्या पाच दिवसांत माणगावात कोरोना रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली आहे. माणगाव तालुक्यातील 25 गावांतून आतापर्यंत कोरोनाची …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तहसीलदारांकडे मागणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात अनेक दिवसांपासून वीज गायब आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत येणार याबाबत कोणतीच शाश्वती नाही. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानाही वीज मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन केले जात नाही. अशा वेळी जनतेने न्याय कोणाकडे मागावा, अशी कैफियत मुरूड तहसीलदारांकडे मांडण्यात आली असून तालुक्यात …

Read More »

सहा आसनी रिक्षांचे स्विच ऑन

अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने ऑफ केलेले सहा आसनी प्रवासी रिक्षांचे स्विच अलिबागेत सोमवारपासून ऑन झाले आहेत. आता रिक्षाचालकांना प्रतीक्षा आहे ती प्रवाशांची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मेपासून टाळेबंदी लागली. या टाळेबंदीमध्ये प्रवासी वाहनांचेही स्विच ऑफ झाले. साठवलेल्या जमापुंजीवर काही दिवस गेले, मात्र त्यानंतर रिक्षाचालकांची परवड सुरू झाली. कोरोनाचा …

Read More »

केंद्रीय पथकाकडून मुरूडमधील नुकसानीची पाहणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मुरूडला भेट देत येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पथकाने मुरूड तालुक्यातील बोर्ली, काशिद, नांदगाव, आगरदांडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या …

Read More »

साजगावमधील गुन्हेगारीला बसणार चाप

पोलीस निवारा केंद्राची उभारणी खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील लघुउद्योगनगरी असलेल्या साजगाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा बसावा यासाठी पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पोलीस निवारा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या साजगावमध्ये कारखानदारी हातपाय पसरत …

Read More »

महिला पोलिसाचे घर जळून खाक

खोपोली ः प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्रह्मांडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलिसाच्या फ्लॅटला मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली.   आगीचे कारण अद्याप समजले नाही. श्रद्धा लोखंडे सकाळी अंबरनाथ येथे ड्युटीसाठी घरातून निघाल्या. त्या …

Read More »

उरणमध्ये आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उरण ः प्रतिनिधी उरण परिसरात मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी चाणजे-तांडेलनगर येथील दोन पुरुष, तीन महिला, तर बोरी येथील एक पुरुष व एक महिला असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोप्रोली येथील 38 वर्षीय रुग्णालाडिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची …

Read More »

पोलादपूर तालुका झाला कोरोनामुक्त!

संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेचे आवाहन; सर्व यंत्रणांचे सहकार्य पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात 18 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे एकूण 21 रुग्ण आढळून आले. शेवटचे सात रुग्ण होम आयसोलेशन करून देखभाल व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि. 16) दुपारी अधिकृतरीत्या पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची …

Read More »