ग्रामस्थांचे हाल; टँकरने पाणीपुरवठा सुरू खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात खालापूर तालुक्याच्या पाचवीला पुजलेले पाणीटंचाईचे संकटदेखील घशाची कोरड वाढवत आहे. ठोस उपचारांअभावी टँकरची मात्रा सध्या देण्यात येत आहे. खालापूर तालुक्यात प्रचंड जलसाठा असतानादेखील पावसाळा संपताच अनेक भागात पाणीटंचाई जाणवते. या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात वर्षानुवर्षे प्रशासनाला अपयश येत आहे. खालापूर तालुक्याच्या …
Read More »पायी गावी निघालेल्या मजुरांची केली व्यवस्था
रमजान काळात मुस्लिम तरुणांकडून पुण्यकर्म कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या महामारीत लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कामानिमित्त असलेले लोक अडकून पडले आहेत. त्यातील काही जणांनी चालत परतीचा मार्ग धरला आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे असेच उत्तर प्रदेश येथे निघालेले नागरिक पोहोचले तेव्हा कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांची राहण्याची सोय करून …
Read More »पेणमध्ये मजुरांची आरोग्य तपासणी
पेण : प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी वडखळ येथील जेएसडब्ल्यू वसाहतीमधील परप्रांतीय कामगारांनी अचानक आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी या परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याबाबत आदेश दिल्याने या कामगारांची आरोग्य तपासणी पेण नगर परिषद मैदानात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ओडिशा येथील परप्रांतीय कामगारांसाठी 16 बस असून टप्याटप्याने इतर …
Read More »सुधीर नाझरेंच्या छायाचित्राला ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत मेडल
मुरूड : प्रतिनिधी – येथील वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या छायाचित्राला ग्रँड इंटरनॅशनल सर्कीट 2020 या स्पर्धेत आयजीसीचा हॉनॉर्बल मेन्शन मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल नाझरे यांचे अभिनंदन होत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 22 देशांचे 400 छायाचित्रकार सहभागी झाले होते, तर त्यांच्या 2200 छायाचित्रांचा समावेश होता. यात सुधीर नाझरे …
Read More »दिवीलमध्ये दाम्पत्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण
15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील दिवील गावात जुन्या वादातून पती, पत्नी आणि पतीच्या पुतण्याला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रियंका प्रकाश देवे आणि तिचा पती प्रकाश बाबू देवे तसेच पुतण्या हे बुधवारी …
Read More »दोन रिक्षांची धडक; एक जखमी
बदलापूरच्या वाहनात आढळल्या दारुच्या बाटल्या कर्जत : बातमीदार – कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे गुरुवारी (दि. 7) दोन रिक्षांमध्ये अपघात झाला. या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाला धडक देणार्या दुसर्या रिक्षात दारूच्या 16 बाटल्या आढळल्या. यावरून संबंधित रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडून नेले आहे. कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ …
Read More »कर्जतमधील गर्भवतीचा नवजात बालकासह मृत्यू
नातेवाइकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप कर्जत : बातमीदार – बाळंतपणासाठी दाखल केलेल्या कर्जत तालुक्यातील कुंडलज येथील गर्भवती महिलेचा बाळंतपणादरम्यान बालकासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी आरोग्य यंत्रणेवर संशय व्यक्त केला असून, डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कुंडलज येथील गर्भवती महिला प्रिता जसपाल सिंग …
Read More »महाडमध्ये परप्रांतिय कामगाराला कोरोना
तालुक्यात उडाली खळबळ महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील बिरवाडीपाठोपाठ सवाणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेलटोली गावात राहात असलेल्या एका 45 वर्षीय परप्रांतिय कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला यापूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. महाड तालुक्यातील शेलटोली गाव …
Read More »उरणच्या ‘इंडियन ऑइल’कडून 10 लाख रुपयांची मदत
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात गहिर्या होणार्या कोरोनासंकटाशी लढा देणार्या अलिबाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीस उरण येथील इंडियन ऑइलटँकिंग कंपनीने हातभार लावत दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपुर्द केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये …
Read More »खालापूर भाजपने जपली माणुसकी
खोपोली : प्रतिनिधी परप्रांतीयांची मूळगावी जाण्यासाठी होणारी फरफट पाहून खालापूरातील भाजप पुढे सरसावली आहे. तालुक्याचे अध्यक्ष बापू घारे, राकेश गव्हाणकर, अनिल उत्तेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचार्यांना सहाय्य केले. तसेच वावोशी हद्दीतील आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतचे भाजपचे सदस्य महेश कडू तसेच जिल्हा परिषद …
Read More »