अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील 70 कुटुंबांनी घेतला लाभ पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या खेड्या पाड्यातील गोरगरिबांना आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगने धान्याचे वाटप करण्यात आले. देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून संपूर्ण देशात 3 मे पर्यंत …
Read More »रुग्णालयीन कर्मचार्यांना कोरोनाविषयक प्रशिक्षण
कर्जत ः बातमीदार – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी-कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य कर्मचार्यांनी आपल्या समस्या आणि मागण्या पुढे करून त्यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख सुचिता गवळी …
Read More »विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई
रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये, विनापरवाना व विनाकारण वाहने घराबाहेर काढू नये, अशा सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तरीही विनापरवाना वाहने घेऊन फिरणार्या वाहनचालकांवर कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. …
Read More »पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी – कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडणार्या पोलीस बांधवांना प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनच्या वतीने मास्क, सेनेटायझर, पाणी आदींचे वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोनाचे संकट ओढवले आहे, मात्र या आणीबाणीच्या स्थितीत पोलीस बांधव रात्रंदिवस जीवाचे रान करून कायदा-सुव्यवस्था …
Read More »कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मांडावणे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
16 नागरिकांची अतिदक्षता टीम सज्ज कडाव ः वार्ताहर – भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायती कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील मांडावणे ग्रामपंचायतीने वेगळी शक्कल लढवत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीमधील 16 नागरिकांची अतिदक्षता टीम तयार करून तिचे चार …
Read More »कर्जतचे कोरोना संकट तूर्तास टळले
सात जणांच्या टेस्ट निगेटिव्ह; जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू कर्जत ः बातमीदार – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यावर आलेले कोरोना संकट सध्या तरी टळले असून गेली चार दिवस लॉकडाऊन असलेल्या नेरळ आणि कर्जत येथील बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता उघडल्याने …
Read More »छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पाऊस संपला की लग्न सराई व अनेक मोठ मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रामाची कायमस्वरुपी आठवण रहावी म्हणुन हा सोहळा टिपणारा छायाचित्रकार व शुटींग करणारे व्यवसायिक लाखो रुपये कर्जानी काढुन यावर्षी कॅमेर्यात गुंतवणुक केली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा …
Read More »नागोठणे पोलिसांकडून हातभट्टी उद्ध्वस्त
नागोठणे : प्रतिनिधी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार मोहन म्हात्रे, हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील, जितेंद्र चव्हाण, नयन रसाळ, सचिन भोईर, गंगाराम दुमाणे, सत्यवान पिंगळे या पोलीस पथकाने शुक्रवारी (दि. 24) पहाटे विभागातील गोयंडा आदिवासीवाडीच्या पूर्वेकडील जंगलात भागात हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. या …
Read More »सफाई कर्मचार्यांबाबत सद्भावना
पेण ः प्रतिनिधी कोरोनावर मात करण्यासाठी देशातील प्रत्येक नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. नर्स, सफाई कामगार आणि डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत ठरले …
Read More »संचारबंदीत कोलाड पोलिसांचा चोख बंदोबस्त
रोहे : प्रतिनिधी लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या काळात कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 तास कोलाड पोलिसांची गस्त सुरू आहे. रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून एक पोलीस ठाणे तालुक्याच्या ठिकाणी, तर दोन महत्त्वाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व नागोठणे …
Read More »