Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

श्रीवर्धन तालुक्यात विजेचा लपंडाव

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असून, संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. अशा वेळी महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे, मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. …

Read More »

सरसगड किल्ल्यावरील वणवा धाडसाने विझविला

पालीतील दोन तरुणांचा पराक्रम पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील डोंगर रानावनात, जंगलभागात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये वनसंपदा व जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होते. अशाच प्रकारे सरसगड किल्ल्यावर वणवा लागला होता. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता तसेच वृक्षराजी आणि पशू-पक्ष्यांचीदेखील हानी झाली …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

17 गावे आणि 59 वाड्यांना टँकरची प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत, मात्र या कृती समितीचे काम कोरोनामुळे …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई

33 गावे आणि 148 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा   अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट नसले तरी पाणीटंचाईची समस्या मात्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांतील एकूण 33 गावे आणि 148 वाड्यांना  जिल्हा प्रशासनाकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 …

Read More »

लॉकडाऊनमुळे वाहनांचा ताबा मिळण्यास अडचणी

पोलादपूर : प्रतिनिधी – गेल्या गुढीपाडव्यासह रविवारचा अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त चुकल्याने वाहनखरेदी करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीयांसह श्रमजीवींनी केलेल्या कोटयवधी रूपयांच्या गुंतवणुकीबाबत लॉकडाऊनमधून कोणताही पर्याय निघाला नसल्याने या गुंतवणुकीसह गुंतवणुकदारांचेही भवितव्य अंधारात आले आहे. हे दोन्ही मुहूर्त टळल्यानंतरही वाहन खरेदीबाबतच्या कोणत्याही व्यवसाय आस्थापनांना लॉकडाऊनमधून मुभा न मिळाल्याने वर्क फ्रॉम होम करणार्‍या या …

Read More »

शाळा बंद…ऑनलाइन शिक्षण सुरू!

पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च पासून शाळा बंद झाल्या. परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. त्यातच टाळेबंदीची मुदत वाढत आहे हे पहाता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला. त्यानुसार सुधागड तालुक्यातील राजिप नेणवली शाळेत देखील …

Read More »

पेण शिक्षण महिला समितीतर्फे शासनास एक लाखाची मदत

पेण : प्रतिनिधी – देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असताना प्रत्येक जण यथाशक्ती मदत करीत आहे. अशातच पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष सुहासिनी देव व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस व 50 हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत असे एकूण एक लाख रुपयांची मदत दिली …

Read More »

जिल्हाधिकार्यांनी साधला नेटीझन्सशी थेट संवाद

अलिबाग : जिमाका – “कोरोना संकटाचा सामना : रायगड जिल्हा प्रशासनाचा पुढाकार” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी सहभाग घेतला आणि कोविड-19 शी लढण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत राज्यभरातील नेटिझन्सशी संवाद साधला. इलेट्स टेक्नोमीडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केलेल्या ई-गोव्ह मासिकाद्वारे या वेबिनारचे आयोजन केले होते. याचे …

Read More »

भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा -कृष्णा कोबनाक

माणगाव : प्रतिनिधी – मित्रांनो कोरोनाची दहशत पाहता आपण, भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा, असे अवाहन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचे भाजपचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी केले आहे. जगात प्रथमच  करोना नावाने एक प्रचंड मोठा संसर्गजन्य रोग आलेला आहे. या महामारीमुळे संपुर्ण जग …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांचा आदिवासी बांधवांना मदतीचा हात

3000 कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप पाली : प्रतिनिधी – सुधागडवासीय आदिवासी बांधवांना आमदार रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला असून  3000 आदिवासी कुटूंबाना धान्याचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या जैविक महामारीत हातावर पोट असलेले मजूर, श्रमजीवी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना मोठ्या कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्तितीत कुणावरही उपासमारीची …

Read More »