भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली. दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास …
Read More »माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके
महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू माणगांव : प्रतिनीधी माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले. …
Read More »पर्यावरण, पर्यटनक्षेत्र आंबेनळी घाटाची डागडुजी
रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट 4 जानेवारी 2023 रोजी दुरूस्ती कामासाठी बंद राहिल्याने या अनुषंगाने या घाटाच्या इतिहासाची पाने चाळविण्याची गरज भासू लागली. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 …
Read More »पेण तालुक्याची ईव्हीएमच्या साठवणुकीसाठी निवड
शितोळे येथे प्रांताधिकार्यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन पेण ः प्रतिनिधी पेण हे जिल्ह्यातील मतदारसंघांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील शितोळे आदिवासीवाडीजवळील जागेची निवड ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमिपूजन शितोळे येथे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते …
Read More »मोठ्या बसेसना जंगल जेट्टीमध्ये स्थान दिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा
मुरुड : प्रतिनिधी मुरुड श्रीवर्धन तालुक्यात अगदी सहज प्रवास करता यावा म्हणून जंगल जेट्टीची सुविधा महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून करून देण्यात आली आहे. या जेट्टीमध्ये मोठ्या बसेसना स्थान दिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. आगरदांडा ते दिघी 15 मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशी वर्गाना मोठी किंमत मोजून प्रवास करावा लागत आहे. दिघी क्वीन …
Read More »शेतीसाठी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजनाला कालव्याला दुबार भातशेतीसाठी पाणी सोडण्यात येते. यंदाही पाणी सोडण्यात आले आहे, मात्र भातशेती लावण्यासाठी जे चांगले बियाणे आवश्यक असते ते बियाणेच कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आता भातशेती करायची तरी …
Read More »अदानी कंपनीला वितरण परवाना देऊ नये
पाली सुधागडमध्ये संपाला प्रतिसाद; वीज कर्मचार्यांच्या मागण्या मान्य पाली : प्रतिनिधी महावीतरण कंपनीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात पाली सुधागडचे वीज कर्मचारी अभियंता मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिणामी पाली विजवीतरण कार्यालय बंद आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महावितरण कंपनीच्या विभागात समांतर वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळवण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. मागितलेल्या परवान्यासमहानिर्मिती, …
Read More »घरे उभारणारेच होताहेत बेघर
नाका कामगारांचे जीवन असुरक्षित मुलांच्या नशिबीही बिगारीचे काम मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी कामांकरीता ठेकेदारांकडे बिगारी कामे निघत आहेत. या कामांकरीता मोहोपाडा रसायनी परीसरात नाका कामगार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यांना रोजंदारीचे …
Read More »भाजप सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांचे रायगडातील पदाधिकार्यांना मार्गदर्शन
महाड दौर्यात महापुरुषांना अभिवादन महाड : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी बुधवारी (दि. 4) महाडचा दौरा करीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांचे पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सहकार्यांनी जोरदार स्वागत केले. उत्तर व दक्षिण जिल्हा पदाधिकारी कोअर बैठकीसाठी शिवप्रकाश हे महाड येथे आले होते. या वेळी …
Read More »कडक बंदोबस्तात पोलीस भरती सुरू
अलिबागेत तरुण-तरुणींची गर्दी; पहिल्या दिवशी मैदानी चाचणी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील शिपाई आणि चालक पदाच्या भरतीची प्रक्रिया मंगळवार (दि. 3)पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी चालकपदासाठी पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. कुठलाही गैरप्रकार किंवा अनुचित प्रथा रोखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. …
Read More »