Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये महायुतीची प्रचार रॅली

कर्जत : प्रतिनिधी विधानसभेचे कर्जत मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये शनिवारी (दि. 19) पदयात्रा रॅली काढण्यात आली होती. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्रसाद सावंत व शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व रयत क्रांती महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी …

Read More »

पेणमध्ये महायुतीला वाढता प्रतिसाद

जनता रविशेठ पाटील यांच्या पाठीशी -गटनेते अनिरुद्ध पाटील पेण : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीला मिळणारा मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता येथे रविशेठ पाटीलच बाजी मारतील, असा विश्वास नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केला. विकासकामांचा ध्यास घेतलेले रविशेठ पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन आपले …

Read More »

चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या!

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातदेखील वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. ‘वोट कर रायगडकर‘ , ‘चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या‘, ‘आपका वोट आपकी ताकद‘, ‘एकच लक्ष्य मताचा हक्क‘,  ‘मतदारराजा …

Read More »

काँगे्रसने महाराष्ट्राला लुटले

उद्धव ठाकरे यांचा माणगावमध्ये हल्लाबोल माणगाव ़: प्रतिनिधी राज्यात सत्तेवर असताना काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेचा दुरुपयोग केला आणि आता चौकशा सुरू झाल्यानंतर युती सरकार सूडाने वागत असल्याच्या बोंबा काँग्रेसवाले ठोकत आहेत. काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेवर असताना जनतेचे पैसे फस्त करून महाराष्ट्राला लुटले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. …

Read More »

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यात पाऊस काहीसा अडथळा आणत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 18) दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या तुरळक सरीदेखील पडल्या. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही …

Read More »

चढत्या पार्‍याबरोबरच राजकीय वातावरणही तापले

अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर हीटमुळे उन्हाचा पारा चढला आहे, पण उन्हाची पर्वा न करता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चढत्या पार्‍याबरोबरच राजकीय वातावरणही सध्या तापले आहे.  ऑक्टोबर महिना मध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील इतर विभागांपेक्षा अलिबागमध्ये तापमान कमी असते. असे …

Read More »

कर्जत मतदारसंघात शिवसैनिकांना भगवा फडकविण्याची सुवर्णसंधी

कर्जत : बातमीदार विधानसभेच्या कर्जत मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरीचा त्रास जाणवला नाही. त्याने शिवसेना हा पक्ष पहिल्यांदा सुखावला आहे. या वेळी आठ इच्छुक असूनदेखील बंडखोरी शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आले आहे. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात सेनेच्या अधिकृत उमेदवाराला 1999, 2009 आणि 2014 मध्ये बंडखोर उमेदवारांमुळे पराभव स्वीकारावा लागला …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तीन हजार 483 पोलिसांच्या ताफ्यासह पाच केंद्रीय सुरक्षा बलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात …

Read More »

अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेचा रविशेठ पाटील यांना जाहीर पाठिंबा

पेण : प्रतिनिधी  येथील अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 17) भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. रायगड जिल्हा रिक्षा चालक-मालक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय घरत यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे उपाध्यक्ष समाधान पाटील, यशवंत चौलकर, उदय माने, राकेश घासे, दत्ता भडकले, राजू जंगम, अमोल …

Read More »

पेणमध्ये ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पेणजवळील रामवाडी ब्रिजवर पुन्हा एकदा अपघात होऊन दुचाकीवरील महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. जगदिश हिरामण कोळी (40, रा. कोळवे, वडखळ) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच-06,बीएल-7608) पत्नी तृप्तीसह (35) गुरुवारी (दि. 17) सकाळी वडखळ बाजूकडून पेणकडे येत होते. रामवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला …

Read More »