Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये महेंद्र थोरवेंना मुस्लिम बांधवांचा पाठिंबा

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची पोसरी (ता. कर्जत) येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी  निवडणुकीत थोरवे यांना साथ देण्याचे वचन दिले. कर्जत तालुक्यातील दामत भडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच साजिद नझे तसेच जलील नझे यांच्यासह नदीम खान, हमीद अन्सारी, शनी मुल्ला, समीर …

Read More »

श्री धावीर महाराजांना सशस्त्र सलामी, पालखी सोहळ्यास सुरुवात; हजारो नेत्रांनी टिपले क्षण

रोहे ः प्रतिनिधी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सर्वांसाठीच पर्वणी असते. सशस्त्र सलामी पाहण्यासाठी व श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवसाय व कामानिमित्त गेलेले रोहेकर व महाराष्ट्रातील श्री धावीर महाराजांचे तमाम भक्तगण रोह्यात येत असतात. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 9) रोहेकर श्री धावीर मंदिरात सकाळी जमण्यास …

Read More »

रायगड जिल्ह्यात 160 टक्के पाऊस

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत पावसाने कधीही सरासरी चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला नव्हता. यंदा आतापर्यंत यावर्षी पाच हजार 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरी 160 टक्के पाऊस पडला आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा एक हजार 800 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस उद्या पेणमध्ये

पेण : प्रतिनिधी 191 पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा सायंकाळी 4 वाजता नगर परिषदेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

भाजपत जोरदार इनकमिंग, खोपोली, खालापुरातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

खोपोली ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच असून, दसर्‍याचा मुहूर्त साधून खोपोली व खालापूर तालुक्यातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

वाधवन यांचा फार्म हाऊसही रडारवर

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांच्या आवास येथील फार्म हाऊसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील ठोकले आहे. दरम्यान, वाधवन यांचा हा बंगला सीआरझेड कायद्याच्या रडारवर आहे. आवास व सासवणे गावांदरम्यान समुद्रकिनार्‍याला लागूनच …

Read More »

माथेरानमध्ये दसर्याच्या सणाला घोड्यांची पारंपरिक मिरवणूक

कर्जत : बातमीदार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमधील प्रमुख वाहन घोडा असून, येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून घोड्याला विशेष महत्त्व दिले जाते. दसर्‍याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) अश्वचालकांनी सजवलेल्या घोड्यांची विधिवत पूजा करून माथेरानमध्ये मिरवणूक काढली होती. दसर्‍याच्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता घोडेमालकांनी आपल्या घोड्यांच्या खुरांची पूजा केली व फुलांचे …

Read More »

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस विचारांची पेरणी आवश्यक -वेच्या गावित

कर्जत : बातमीदार आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सकस विचारांची पेरणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य शिक्षण विभागाचे मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील आश्रमशाळेत व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले ध्येय गाठावे यासाठी राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा यांच्या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद …

Read More »

खालापूर तालुक्याला वादळी वार्याचा तडाखा

आदिवासी पाड्यावर घरांचे नुकसान खालापूर : प्रतिनिधी परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 7) संध्याकाळी खालापूर तालुक्यात धुमाकूळ घातला. या वेळी वादळी वार्‍याने अनेक घरांचे नुकसान केले, तर काही ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त केली. सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने खालापूर तालुक्यामधील भिलवले आदिवासी वाडीतील अनेक झोपड्या जमीनदोस्त केल्या, तर काही झोपड्यांचे छप्परही …

Read More »

‘ईडी’च्या कारवाईबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ

वाधवान बंधूंच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र  बँक (पीएमसी) प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) छापा टाकला. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते याचा शोध ईडी घेत आहे, मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन …

Read More »