मुरूड : प्रतिनिधी नांदगाव हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 17) साखरचौथ गणपती ‘पंचक्रोशीचा राजा‘ विराजमान झाला. फटाक्यांच्या आतषबाजीत व बेंजोच्या तालावर पंचक्रोशीचा राजाचे आगमन झाले. त्याच्या पूजेचा मान अशोक दहिगावकर व त्यांच्या पत्नी लता यांना मिळाला. शैलेश जोशी यांनी पौरोहित्य केले. या वेळी सजावटीद्वारे चांद्रयान मोहिमेची माहिती मुलांना देण्यात आली आहे. या …
Read More »कर्जतच्या चित्रकाराचा अमेरिकेत सन्मान
कर्जत : बातमीदार पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या न्यूयॉर्क येथे भरविण्यात आलेल्या 47व्या वार्षिक अंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राचा समावेश आहे. सलग दुसर्या वर्षी या प्रदर्शनासाठी निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. न्यूयॉर्कमधील द नॅशनल आर्ट्स क्लबमध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात जगातील …
Read More »रोह्यात अडीच टन निर्माल्य जमा; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
रोहे ः प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री सदस्यांनी रोहा अष्टमी परिसरातील गणेश विसर्जनाच्या वेळी दोन टन 700 किलो निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून ते झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या …
Read More »देवघर ग्रामपंचायतीची चौकशी करावी ; ग्रामस्थांचे ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांना साकडे
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देवघर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, या ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याच्या गटविकास अधिकार्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत देवघर ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येणार्या कामांत मोठ्या …
Read More »तांबस-बारणे रस्ता गेला वाहून; वाहतूक बंद
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी सततच्या पावसामुळे राजनाला कालव्यातून वाहून आलेले पाणी कर्जत तालुक्यातील चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्याचा तांबस येथील भाग वाहून गेला आहे. त्यामुळे बारणे गावाच्या अलीकडे असलेल्या ग्रामस्थांना पलीकडे कडाव येथे जाणे बंद झाले आहे. कर्जत तालुक्यातील कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव रस्त्यालगत राजनाला कालवा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यास कालव्यातील …
Read More »‘विधानसभे’साठी प्रशासनही होतेय सज्ज; अलिबागमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती; मतदारांचा प्रतिसाद
अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (ततझ-ढ: तेींशी तशीळषळशव झरशिी र्-ीवळीं ढीरळश्र) मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून, या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व …
Read More »बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी
पनवेलमध्ये 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन अलिबाग ः जिमाका महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांचे विद्यमाने, रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता के. व्ही. कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) वडाळा तळावाजवळ, (ता. पनवेल, जि. रायगड) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. …
Read More »प्रभाकर मोरेंना अखेरचा निरोप
महाड : प्रतिनिधी माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्व. मोरे यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाड विधानसभा मतदारसंघात विकासाची …
Read More »चिवे शाळेच्या दोन संघांची निवड; मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धा
पाली : प्रतिनिधी मुंबई येथे होणार्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेच्या दोन कबड्डी संघांची निवड झाली आहे. या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. अलिबाग येथील पीएनपी संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. यात चिवे आश्रमशाळेच्या 14 …
Read More »एसईएस टॉपवर्थ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार
पाली : प्रतिनिधी राज्य भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने दिला जाणारा स्काऊट-गाइड राज्य पुरस्कार येथील एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यापैकी सेजल जाधव या विद्यार्थिनीचा सत्कार नुकताच दादर येथे शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या सेजल जाधव, अश्विनी …
Read More »