Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वडिलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

कोशिंबळे येथील कानाडे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे धाव माणगाव : प्रतिनिधी शेतावर खत टाकण्यासाठी गेलेले आपले वडील तुकाराम लहु कानाडे यांचा मृतदेह दोन दिवसांनी गवतात आढळला. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र माझ्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी गुप्तचर खात्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी कोशिंबळे तर्फे निजामपूर …

Read More »

खालापुरात राष्ट्रीय लोक अदालत

14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली; 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली खालापूर : प्रतिनिधी येथील दिवाणी न्यायालय आणि तालुका विधिसेवा समिती यांच्या वतीने खालापूर येथे शनिवारी (दि. 14) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात एकूण 69 लाख 68 …

Read More »

खालापुरात आरोग्य तपासणी शिबिर

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी भाजपच्या खालापूर तालुका मंडळतर्फे गोहे गाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 155 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी सांगितले. खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनोज …

Read More »

शिर्की गावात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनी आणि शिर्की ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्की गावांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 17) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे, माजी सदस्य वैकुंठ पाटील, जेएसडब्ल्यूचे विनायक दळवी, बळवंत जोग, वडखळ सरपंच राजेश मोकल, मसद सरपंच बळीराम भोईर, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

म्हसळ्यात फळे व बिस्कीटवाटप म्हसळा : प्रातिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा भाजपतर्फे मंगळवारी (दि. 17) तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी व म्हसळा आदिवासीवाडी येथील अंगणवाडीमधील मुलांना तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली. जिल्हा नियोजन योजनेंतर्गत 12 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या घणेरीकोंड रस्त्याचे …

Read More »

नेरळ वाल्मिकीनगर शाळेच्या वर्गखोलीचे काम ठप्प

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पालक संतप्त कर्जत : बातमीदार  नेरळ वाल्मिकीनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने तेथे नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या या वर्गखोलीचे काम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळमधील वाल्मिकीनगर …

Read More »

महडमध्ये साकारली गणरायाची सुबक रांगोळी

खोपोली  :  प्रतिनिधी   अष्टविनायकापैकी मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या महड गावातील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी परिसरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. अंगारक चतुर्थीनिमित्ताने कसळखंड  येथील रोशन पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुंदर अशी मनमोहक रांगोळी काढली होती, तसेच गणेशभक्तांना दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी वाहनांची व पाण्याची व्यवस्था करण्यात …

Read More »

‘खोपोलीत डेंग्यूची साथ नाही’

खोपोली : प्रतिनिधी शहरात मागील आठवड्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले होते. त्या सर्वांच्या रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांनी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही केले. लक्ष्मण गायकवाड …

Read More »

मुसळधार पावसातही बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी

पाली : प्रतिनिधी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.17) मुसळधार पावसातही भाविकांनी गर्दी केली होती. येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत होता.  रायगडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक व पर्यटक मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. काही तरुण, महिला  पायी चालत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आल्या …

Read More »

पेण तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव

पेण : प्रतिनिधी  तालुक्यात सार्वजनिक तसेच घरगुती साखरचौथ गणपतींची मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र मंगलमय वातारवण निर्माण झाले आहे. अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजनल अष्टविनायक मित्र मंडळ, प्रेमनगर मित्र मंडळ-चिंचपाडा, सुंदरनगर मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ-देवआळी, श्री गणेश …

Read More »