Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भिवपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक मार्गिका पाण्याखाली

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांना येण्यासाठी असलेला रस्ता आणि मुंबईकडे जाणारी एक मार्गिका पाण्याखाली गेली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवपुरी रोड स्टेशनमध्ये जाणे कठीण होऊन बसले आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या कर्जत एन्डकडे डिकसळ हे गाव रेल्वे मार्गाला लागून आहे. त्यापुढे अनेक गावे असून, तेथील …

Read More »

नागोठण्यात पुन्हा पूर

दरड पडल्याने भिसे खिंडीतील रस्ता; तसेच नागोठणे रोहे रेल्वे मार्ग ठप्प नागोठणे : प्रतिनिधी मंगळवारी सायंकाळपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारपर्यंत पुराने नागोठणे बाजारपेठ, तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता. दरम्यान, ग्रामपंचायत, …

Read More »

खोपोलीतील जनजीवन विस्कळीत; पाताळगंगेला पूर

सावरोली पुलावर पाणी खोपोली : प्रतिनिधी खोपोली-खालापूर परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे खोपोली -कर्जत व मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली वाहतूक विस्कळीत झाली. राष्ट्रीय महामार्ग व एक्स्प्रेस वेला जोडणार्‍या सावरोली पुलावर पाताळगंगा नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूकही काही काळ …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाऊस धुवांधार

सुधागड जलमय; अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 4) अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली आंबा नदी पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले, तसेच जांभूळपाडा आंबा नदी पुलालादेखील पाण्याने वेढा दिला.त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बुधवारी बंद ठेवण्यात आली …

Read More »

खोपोली शहरात काँग्रेसला खिंडार

खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक, विद्यमान शहर अध्यक्ष व विद्यमान काँग्रेस कमिटीचे बहुतांश पदाधिकारी रविवारी (दि. 1) भाजपत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दाखल झाले. कर्जत-खालापूरचा आमदार भाजपचाच, असा निर्धार या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. या वेळी विद्यमान शहर अध्यक्ष संतोष खुरपुडे, युवक अध्यक्ष रॉबिन सॅम्युअल, …

Read More »

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

अलिबाग ः प्रतिनिधी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आतुर झाले असून त्याच्या स्वगताची तयारी करण्याची लगबग सध्या सुरू आहे. सोमवारी (दि. 2) गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात आज अक्षरशः झुंबड उडाली होती. रायगड जिल्ह्यात 277 ठिकाणी सार्वजनिक, तर एक लाख एक हजार 325 घरगुती …

Read More »

कोकणात जाणारी एसटी जळून खाक

52 प्रवासी थोडक्यात बचावले; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता माणगाव लोणेरेनजीक वडवली गावाजवळ कोकणात जाणार्‍या मुंबई चिपळूण-दहिवली या एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचा बर्निंग थरार अनुभवण्यास मिळाला. एसटीच्या चालकाच्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवासी सुखरूपरीत्या खाली उतरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी …

Read More »

चोरढे शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा

रेवदंंडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याला चालना देऊन प्रोत्साहन देण्यासाठी चोरढे जिल्हा परिषदेच्या मुरूड तालुक्यातील मराठी शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा उपक्रम शिक्षकवर्गाने राबविला. या वेळी मान्यवर मंडळी व पालकवर्गाने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ शाळा समितीचे अध्यक्ष संदीप घाग यांंच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेच्या जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये …

Read More »

बास्केटबॉलमध्ये कारमेल स्कूलची बाजी

अलिबाग : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच खोपोली येथील कारमेल स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान संघाने बाजी मारली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून विविध गटांत 35 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिओनी, …

Read More »

सोमवंशीय माळी समाजासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून सात लाखांचा निधी मंजूर

मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील सोमवंशीय माळी समाजासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने जिल्हा नियोजन मंडळाकडून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला असून, तो सोमवंशीय माळी समाजाच्या सभागृहातील स्लॅबवर पत्र्याची शेड …

Read More »