कर्जत : बातमीदार काँगे्रसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी नुकताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, हृषीकेश जोशी …
Read More »जि. प. सभेत दूषित पाणी पेटले
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेची गुरुवारी (दि. 22) झालेली सर्वसाधारण सभा दूषित पाणीप्रश्नावरून गाजली. उमटे धरणातून गावागावांत वितरित होणार्या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात आणल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. गणेशोत्सवापूर्वी जलशुध्दिकरण प्रकल्प कार्यान्वित करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अध्यक्षा आदिती तटकरे यांनी वेळ मारून नेली. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांचा आणि …
Read More »खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत
खोपोली : प्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी सहाय्यता निधी म्हणून खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने जनकल्याण समितीला 12 हजार 251 रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी हर्डीकर, उपाध्यक्षा सुनीता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे, सहकार्यवाह वृषाली बेलसरे, खजिनदार सुधाकर भट, खजिनदार अंबादास पाठक, अपर्णा साठे, शशिकांत पाटणकर, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह …
Read More »पेण तालुक्यात 796 दहीहंड्या फुटणार
पेण : प्रतिनिधी पेण शहर व तालुका परिसरात गोपाळकाळा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यात यंदा एकूण 796 दहीहंड्या फुटणार आहेत. त्यात 271 सार्वजनिक, तर खाजगी 525 दहीहंड्यांचा समावेश आहे. त्यांची जय्यत तयारी गोविंदा पथकांकडून करण्यात आली आहे. येथील ललित पाटील मित्रमंडळातर्फे नगरपालिका कार्यालयासमोर यंदा एक लाख 11 …
Read More »निवडणूक काळात भाजपमध्ये इनकमिंग जोरात
दिव ग्रामस्थांचा प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी पूरग्रस्तांना तातडीने घरे देण्याचा निर्णय घेणारे, जनतेचे प्रश्न समजून घेणारे व सर्वसामान्याचा विकास साधणारे भाजपचे संवेदनशील सरकार असल्याचे प्रतिपादन भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 21) दिव (ता. रोहे) येथे केले. रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायत हद्दीतील दिव ग्रामस्थांनी बुधवारी …
Read More »यशवंतखार येथे जनावरांना लसीकरण
रोहा : दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव अंतर्गत रोहे तालुक्यातील यशवंतखार गावातील 80 जनावरांना पायलागन रोगविरोधी लसीकरण केले. या वेळी पशुचिकित्सक डॉ. युवराज सुरकुले आणि परिचर दिवेकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांनी शेतकर्यांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे पटवून दिले. या वेळी घेण्यात आलेल्या शिबिरात रोहा येथील कृषी विज्ञान …
Read More »पेणच्या बाजारात दहीहंडीसाठी लागणारी आकर्षक मडकी
पेण : प्रतिनिधी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणच्या बाजारात रंगविलेली मातीची आकर्षक मडकी विक्रीस आली आहेत. त्याची खरेदीसुद्धा सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवाला सर्वत्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडणे हे गोविंदा पथकांचे मुख्य आकर्षण असते. या दहीहंड्या फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके दोन महिन्यांपासून सराव करीत असून, दहीहंडी …
Read More »पूरग्रस्तांना त्वरित भरपाई मिळण्याची मागणी
आगरी समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन पेण : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पेण तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगरी समाज विकास मंचाच्या वतीने पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हात्रे, …
Read More »नेरळ पंचवटी येथील रस्त्याचा एक भाग बंद
कर्जत : बातमीदार दरड कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसांपासून कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा पंचवटी जिते फाटा वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावर जिते फाटा येथे असलेल्या खासगी टेकडीवर गेली काही वर्षे माती उत्खनन केले जात आहे. …
Read More »ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
रोहा : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा नववा वर्धापनदिन वसंत महाबळे यांच्या आंबेवाडी येथील निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. या वेळी 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र, समई, ताम्हण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे चिटणीस अशोक कदम यांनी अहवाल व …
Read More »