Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीबाबत शिवसेना युतीचा धर्म विसरले भाजप शहरप्रमुख श्रीकांत पुरी यांचा आरोप

खोपोली : प्रतिनिधी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना भाजपला विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी केला आहे. अडीच वर्षांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपची मनधरणी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर आगामी रणनीतीबाबत अद्याप भाजपला विश्वासात घेत नाही, असा आरोप पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. …

Read More »

महाडमधील आपदग्रस्तांना मदत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील गांधारपाले येथील 54 पूरग्रस्त कुटुंबीयांना शिवसेनेच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. बिरवाडीमधील पूरग्रस्तांनाही मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी यावेळी सांगितले. महसूल विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसील …

Read More »

एसटी व लक्झरी बसचा अपघात

मुरुड : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद येथील एका उतारावर सोमवारी (दि. 26) सायंकाळी लक्झरी व एसटी बसची धडक झाली. या अपघातात एसटीमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही एससटी बस मुरूड येथून कल्याणला जात होती. तर हंस लक्झरी बस मुंबईकडून मुरुडला येत होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काशीद जवळील एका …

Read More »

‘नगरविकास विभागाच्या विरोधातील प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि धिंडविरोधात रस्त्यावर उतरणार’

रोहे ः प्रतिनिधी रोहे शहराच्या विकासकामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. रोह्यात नदीसंवर्धानसह अन्य चांगली कामे चालू आहेत, परंतु काही लोक या कामाला विरोध दर्शवीत आहेत. रोह्यातील सीटीजन फोरमच्या काही सदस्यांनी कामाला विरोध व मुख्याधिकार्‍यांच्या बदलीविषयी नगरविकास खात्याविरोधात बैठक घेऊन ते प्रतिकात्मक अंत्ययात्रा व धिंड काढणार …

Read More »

महाड आगाराचा गलथान कारभार ; शिवशाही अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

महाड : प्रतिनिधी             येथील एसटी आगारातून सोमवारी (दि. 26) सकाळी बोरीवली येथे जाणारी शिवशाही बस अचानक रद्द करुन त्याऐवजी साधी बस सोडण्यात आली. त्यामुळे शिवशाहीचे आरक्षण केलेले प्रवाशी संतप्त झाले. काही संतप्त प्रवाशांनी तर माणगाव स्थानकात आल्यानंतर बस अडवून धरली. सकाळची शिवशाही बस रद्द करण्याचे प्रकार वारंवार होत असून महाड …

Read More »

दांडफाट्याजवळ एसटीला अपघात; पाच प्रवासी जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर दांडफाट्याजवळ सोमवारी (दि. 26) एसटी बस तीव्र उतारावरून खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरिवली-करमाळा एसटी बस (एमएच 14-बीटी 4689) पनवेलहून खोपोलीच्या दिशेने जात असताना सकाळी 11च्या सुमारास दांडफाट्याजवळ भोकरपाडा गावाच्या …

Read More »

रोह्यात गुरे चोरणारी टोळी जेरबंद

रोहे : प्रतिनिधी  रोहा-साळाव रस्त्यावरील गोफण गावातील गुरे पळविणार्‍या टोळीतील काही सदस्यांना 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहा पोलिसांनी गोफण ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून पकडले. अधिक चौकशीत या टोळीचे मुंब्रा कनेक्शन उघडकीस आले असून या टोळीच्या अटकेने रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील गुरे चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गोफण येथील …

Read More »

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीदार जयराज सूर्यवंशी यांचे आवाहन

श्रीवर्धन : प्रतिनिधी देशातील अल्प व अत्यल्प भूधारकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी संबंधीतांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीदार जयराज सूर्यवंशी यांनी येथे केले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या …

Read More »

रोह्याच्या राजाचे जल्लोषात आगमन

रोहे : प्रतिनिधी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली संकल्पना गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणार्‍या रोह्याच्या राजाच्या मोठ्या मूर्तीचे रविवारी (दि.25) भाटे वाचनालयाच्या हॉलमध्ये जल्लोषात आगमन झाले . रोहे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार किशोर वेदपाठक यांच्या गणपती कारखान्यात ही ‘श्रीं‘ची सुबक मूर्ती साकारली आहे. रविवारी श्रींची मोठी मूर्ती आणण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेश …

Read More »

पेज नदीच्या पुलावर वीजवाहिन्या पडल्या

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली येथील पेज नदीच्या पुलावर गेल्या दहा दिवसांपासून वीज वाहिन्या पडल्या असून, त्याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली हे गाव आणि तीन आदिवासी वाड्या पेज नदीकिनारी वसल्या आहेत. येथे …

Read More »