Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बल्लाळेश्वर देवस्थानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख 11 हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 20) मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे सुधागड तहसीलदारांकडे ब्लँकेट देण्यात आले. श्री …

Read More »

‘निलिकॉन’च्या कंत्राटी कामगारांचा संप

रोहे : प्रतिनिधी न्याय हक्क देण्याबाबत निलिकॉन कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येथील निलिकॉन कंपनीतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) सकाळपासून एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकार्‍यांबरोबर सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. रोहे तालुक्यतील …

Read More »

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मजगाव ग्रामपंचायतीतर्फे मदतफेरी

मुरुड : प्रतिनिधी महापुरामुळे कोल्हापूर -सांगली भागात खूप मोठी हानी झाली.  त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी, या हेतूने मजगाव (ता. मुरुड) ग्रामपंचायतीने मदत फेरीचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत हद्दीतील 14 विविध समाज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी या मदत फेरीत सहभागी झाले होते. ते मदत फेरीतील दानपेटीत शक्ती पैसे टाकण्याचे आवाहन करीत …

Read More »

धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग

नागोठणे : प्रतिनिधी पावसाचा जोर काही अंशी कमी होऊन ऊन पडावयास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या दगडसदृश मातीने आपला रंग दाखवण्यास प्रारंभ केला असून, महामार्ग सध्या धुरळ्यात हरवला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराने  पावडरमिश्रित दगडे टाकून मलमपट्टी केली होती. आता ऊन पडावयास प्रारंभ झाल्याने अवजड …

Read More »

अतिवृष्टीमुळे राजिपच्या 1748 रस्त्यांची धूळधाण

अलिबाग : प्रतिनिधी जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) कार्यक्षेत्रातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील 1748 रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजित 107 कोटींची गरज आहे.  रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या …

Read More »

कर्जत तालुक्यातील पाच सरपंचपदासाठी 35 अर्ज वैध; 13 अर्ज ठरले अवैध

सदस्य पदाच्या 53 जागांसाठी 215 अर्ज वैध कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यासाठी 16 ऑगस्ट हा नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी (दि. 19) दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली, त्यामध्ये 13 नामनिर्देशन पत्रे …

Read More »

पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई ग्रामपंचायत हद्दीमधील दहिगाव येथील तरुण विवेक बबन भालेराव हा 27 जुलै रोजी गावाजवळ नाला ओलांडत असताना वाहून गेला होता. त्याच्या स्मरणार्थ शंकर भुसारी मित्र मंडळातर्फे दहिगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे   वाटप करण्यात आले. या वेळी माजी सरपंच शंकर रामा भुसारी, तसेच दीपक भुसारी, जितेंद्र …

Read More »

शेडाशी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, सीताराम पाटील यांच्या प्रयत्नाने पेण पूर्व विभागातील शेडाशी ग्रामपंचायत हद्दीतील मायनी, मालदेव, तलदेव, खडकीवाडी येथील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रविशेठ पाटील …

Read More »

अलिबागेतील नागरी समस्यांकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष ; जनजागृती ग्राहक मंच करणार पाठपुरावा

अलिबाग : प्रतिनिधी  जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहने उभी करणे, अनधिकृत फेरीवाले, पदपथांची समस्या, भाजीमंडई  आणि मासळी बाजार  परिसरातील अस्वच्छता यासारख्या मूलभूत नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यात नगरपालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती जनजागृती ग्राहक मंचाचे मार्गदर्शक …

Read More »

पेणमध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

पेण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पेण तालुका व शहर भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अटलजींच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, …

Read More »