Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागोठण्यात रस्त्याला भगदाड; अपघाताची भीती

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी येथील नवीन पुलानजीक नागोठणे-पोयनाड मार्गावर उत्तर बाजूच्या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बुजवावे, अशी मागणी केली जात आहे. नागोठण्याकडे येताना या रस्त्याला उतार असल्याने येणारी गाडी वेगाने खाली उतरत असते. त्याच्या बाजूला मोठी दरी असल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्यास या …

Read More »

कर्जतमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट

कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या दहावीच्या 1981-82च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिरसे, तमनाथ व सांगवी येथील प्राथमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक आरओ वॉटर प्युरिफायर बसवून दिले तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले. या शाळेच्या केंद्रप्रमुख तसेच आठवण-82च्या सहकारी प्रतिभा साळोखे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर शिरसे आणि सांगवी शाळेला आठवण 82च्या वतीने …

Read More »

वाकसमध्ये थेट सरपंचासह 10 सदस्य बिनविरोध

कर्जतमध्ये चार सरपंच आणि 40 जागांसाठी होणार निवडणूक कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद बिनविरोध झालेे असून, उर्वरित चार थेट सरपंचपदांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, …

Read More »

श्रीवर्धन कोंडविळे समुद्र किनारी मगरीचे दर्शन

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनार्‍यावर बुधवारी (दि.21) सकाळी जीवंत मगर आढळल्याने पर्यटक व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. समुद्रकिनार्‍यावर मगर सहसा आढळत नसल्याने येथे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोंडविळे समुद्रकिनार्‍यावरील रेतीमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मगर चालत असल्याचे परिसरातील काही ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर या मगरीला पाहण्यासाठी गर्दी पाहण्यासाठी व …

Read More »

खालापूरजवळ गॅस टँकर पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

खोपोली : प्रतिनिधी मुंबई -पूणे महामार्गावरुन चाललेला एलपीजी गॅसने भरलेला टँकर खालापूरजवळ माधवबाग येथे पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातातून चालक सोमनाथ व्यकंट कांदे सुखरूप बचावला आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एचपी कंपनीचा भरलेला गॅस …

Read More »

जिर्णे ग्रामपंचायतीमध्ये शेकापला धक्का ; चाफेगणीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, जिर्णे ग्रामपंचायत हद्दीतील चाफेगणी आदिवासीवाडीवरील परशुराम हरी फसाले, दामा परश्या वाघ, परश्या पांड्या पिंगळा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी  बुधवारी (दि. 21) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजीमंत्री रविशेठ पाटील यांनी स्वागत केले. जिर्णे ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर शेकापला हा मोठा …

Read More »

विविध मार्गावर बससेवा सुरू कराव्यात; भाजपची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरु करावी, या इतर मागण्यांसाठी भाजपच्या वतीने एसटीच्या रायगड विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.  भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश मोहिते, शहर अध्यक्ष सुनील दामले, परशुराम म्हात्रे, अशोक वारगे यावेळी उपस्थित होते. विभागीय नियंत्रक अनघा …

Read More »

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, पेणमधून सुमारे 100 बसेस गणेशोत्सवासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या संख्येत गणेशोत्सव होईपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत परिसरातील …

Read More »

प्रधान महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना

नागोठणे : प्रतिनिधी  कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एनएसएसतर्फे नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय संलग्न रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. रुग्णालयाचे समुपदेशक महेश गोसावी, मंगेश पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी एड्स …

Read More »

अभिनव ज्ञानमंदिर संस्थेची सामाजिक बांधिलकी ; पूरग्रस्तांसाठी चार लाख 30 हजारांचा धनादेश

कर्जत, खोपोली : प्रतिनिधी येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेने कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करून त्याचा धनादेश जनकल्याण समितीकडे सुपूर्द केला. यासाठी संस्थेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जनार्दन मोघे यांनी प्रास्ताविकात दिली. …

Read More »