म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील खरसई येथे दहीहंडी उत्सवाला शनिवारी (दि. 24) गालबोट लागले. येथे पाचव्या थरावरून पडून एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण खोत (23) असे त्याचे नाव आहे. अर्जुन खोत हा श्री समर्थ रामदास सेवा मंडळाचा गोविंदा होता. दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. …
Read More »वीजपुरवठा तोडल्याने मुरूड तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार ठप्प
मुरूड : प्रतिनिधी पाच लाखाचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून न भरल्याने बीएसएनएलच्या मुरूड कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील घरगुती दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. कधी काळी नामांकीत असलेली बीएसएनएल कंपनी अलीकडच्या काळात डबघाईस आली …
Read More »सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्या दलाल, अधिकार्यांवर कारवाई करा
अलिबाग : प्रतिनिधी इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिपसाठी प्रस्तावित असणार्या दिव (ता. रोहा) गावातील गट नं. 133 या सरकारी खाजण जमिनीला खोत दाखवून त्या जमिनी कुळांच्या नावे करून दलाल आणि गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही महसूल अधिकार्यांनी केला. या जमिनी हडप करण्याच्या कटात सामील असलेल्या दलाल व शासकीय अधिकार्यांवर कारवाई करा, अशी …
Read More »हेदवली शाळेत पर्यावरण स्नेहहंडी
कर्जत : बातमीदार पारंपरिक सण अतिशय उत्साहात विविध संस्कारक्षम उपक्रमांनी साजरे केले जाणे हे कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेचे वैशिष्ट्य आहे. शनिवारी गोपाळकालाही शाळेत असाच उत्साहात साजरा झाला. शाळेतील दहीहंडीला स्नेहहंडी असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांत परस्पर स्नेहाचे वातावरण वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली. शालेय परिसरात …
Read More »महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये दहीहंडी साजरी
महाड : प्रतिनिधी महाड आणि पोलादपुर तालुक्यांमध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली. सार्वजनिक दहीहंडीप्रमाणे खाजगी दहीहंड्या देखील बांधण्यात येतात. शहरांमध्ये शिवसेना पुरस्कृत सर्वात उंच हडी बांधण्यांत आली असुन शिवाजी चौक मित्र मंडळाने दखील दहीहंडी फोडणार्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. या वर्षी पुरामुळे अनेकांचे …
Read More »रायगडात दहीहंडीचा थरार
पायरीची वाडी शाळेतील बालगोपाळांनी साजरी केली ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ पाली, बेणसे : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीची वाडीच्या बालगोपळांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आळस, अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धेची हंडी फोडत अनोख्या पद्धतीने ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ उत्सव साजरा केला. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना विषेश महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून …
Read More »खालापुरात एसटीला किरकोळ अपघात
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबईहून पुण्याकडे जाणार्या एसटीच्या निमआराम बसला (एमएच-20, बीएल-3323) महामार्गावरील चौक गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 24)सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी बस शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे जात होती. जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळील रामानंद सागर फार्म हाऊससमोर एक मोटारसायकलस्वार अचानक समोर …
Read More »श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा
श्रीगाव : प्रतिनिधी गोविंदा आला रे आला, एक दोन तीन चार श्रीगावची पोरं हुश्शार, अशा गजरात शनिवारी (दि. 24) अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये लहान-थोरांसह महिलासुध्दा सहभागी झाल्या होत्या. या वेळी गावातील एकूण 46 दहीहंड्या फोडण्यात आल्या. म्हसळा तालुक्यात 852 ठिकाणी गोपाळकाला म्हसळा : प्रतिनिधी गोपाळकाला …
Read More »पोशीरमध्ये दहीहंडीचा जल्लोष
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीरमध्ये दहीहंडी फोडण्याकरिता गोविंदा पथकांनी शनिवारी उत्साहात हजेरी लावली होती. या वेळी गावातील एकमेव बँड पथकाने आखाडा भागात संगीतमय सलामी दिली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली. पोशीरमधील आखाडा (जांभूळपाडा), वरची आळी, खालची आळी, चाफा आळी आदी भागांत दहीहंडीचा उत्साह होता. गावातील लिये परिवाराच्या दहीहंडीबद्दल कुतूहल …
Read More »गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा!
अलिबाग : प्रतिनिधी तरुणांईसह वृद्धांनाही उत्तेजित करणारा गोपाळकाला रायगडात शनिवारी उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार दहीहंड्यांमधील लोणी गोविंदांनी चोरले. यामध्ये सहा हजार 298 खासगी, तर दोन हजार 122 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश होता. अलिबागमध्ये भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचे विशेष आकर्षण होते. सांगली, सातारा, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडातील …
Read More »