Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

दामत-ममदापूर-गोरेगाव मुस्लिम जमात पोहचली कोल्हापूरमध्ये

कर्जत : बातमीदार नेरळ आणि कळंबमधील मुस्लिम जमात पाठोपाठ दामत-ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लिम जमातीने पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या मदतीचे थेट सांगलीमध्ये जाऊन वितरण केले. दरम्यान, दामत या मुस्लिमबहुल गावात राजकीय वातावरणामुळे कोणीही कधी एकत्र येत नाही, पण पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्ताने सर्व जमात एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरळ-बदलापूर रस्त्यावर …

Read More »

रोहा नगर परिषदेविरोधात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

रोहे ः प्रतिनिधी शहरातील डबीर मार्केटच्या उत्तर व दक्षिण बाजूस अनधिकृत पानाची व चहाची टपरी टाकून जाण्या – येण्याचा मार्ग बंद केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी सोमवारी (दि. 19) सकाळपासून रोहा नगर परिषद  मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील डबीर मार्केटच्या इमारतीत रहिवासी कांतीलाल वाघमारे व फरजाना सय्यद या …

Read More »

पाबळमध्ये भाजप-सेनेची विजयी सलामी ; युतीच्या ललिता दामोदर पाटील बिनविरोध, शेकापला धक्का

पेण : प्रतिनिधी शेकापचा बाल्लेकिल्ला समजला जाणार्‍या पेण पूर्व विभागातील पाबळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 (कुरनाड) मधून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. पाबळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत असून, येथील निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत …

Read More »

खोपोलीत वनखात्याची कारवाई ; भानवज-काजूवाडी मार्गावरील 19 बांधकामे जमीनदोस्त

खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वन विभागाच्या जमिनीमध्ये अनेकांनी अनाधिकृत टपर्‍या आणि पत्र्याच्या शेड उभारल्यामुळे वाहतुकीला अढथळा निर्माण झाला होता. वनखात्याच्या अधिकार्‍यांनी पोलीस खात्याला बरोबर घेऊन येथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.   शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वनखात्याच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याने या ठिकाणाहून जाताना वाहतुकीला …

Read More »

श्रीवर्धन मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; म्हसळ्यातील मेळाव्यात जिल्हा धोरणावर कडाडून टीका

म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा येथील काँग्रेसजनांचा निर्धार मेळावा वादळी ठरला. या वेळी बहुतांश नेत्यांनी जिल्हा धोरणावर कडाडून टीका करीत श्रीवर्धन मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा असून तो काँग्रेसला सोडावा, असा आग्रह धरला. या मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, बशीर …

Read More »

पेणमध्ये शेकापला दणका; कार्यकर्ते भाजपत दाखल

पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पेण पूर्व विभागातील करोटी, महलमिर्‍या डोंगर आणि चांदेपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रायगड जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, अविनाश म्हात्रे, …

Read More »

सुधीर नाझरे यांना दोन सुवर्णपदके

मुरूड : प्रतिनिधी राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल सर्किट फोटो स्पर्धेत मुरूडचे सुधीर नाझरे यांच्या दोन छायाचित्रांना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. त्याच्या या दोन छायाचित्रांना जागतिक स्पर्धेत सहभाग मिळाला असून, विविध विषयांवर काढलेली 17 छायाचित्रे प्रदर्शनासाठी निवडली गेल्याने नाझरे यांचे नामवंत छायाचित्रकारांकडून अभिनंदन केले जात आहे. झोतपूर इंटरनॅशनल …

Read More »

खालापुरात भाजपचे संपर्क अभियान

खोपोली : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांना संपर्काद्वारे निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे काम सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून खालापूर-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 17) खरिवली पंचायत समितीच्या रानसई, शिरवली, गोरठण, वावोशी, परखंदे, जांभिवली, होराळे, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मोहन पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

महाड : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते व भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित पवार यांच्या मातोश्री स्मिता मोहन पवार यांचे बुधवारी (दि. 14) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी फौजी आंबावडे …

Read More »

मुक्या जनावरांसाठी माणगावातून हिरवा चारा

माणगाव : प्रतिनिधी येथील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांसाठी हिरवा चारा आणि भुसा तसेच औषधे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या माणगाव येथील प्रतिनिधींनी स्वातंत्र्य दिनी (दि. 15) ‘एक घास …

Read More »