Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापुरातील बोरगावात जमिनीला गेले तडे

खालापूर : प्रतिनिधी माथेरानच्या पायथ्याशी असणार्‍या बोरगाव ताडवाडी (ता. खालापूर) येथील डोंगर भागातील जमिनीला तडे गेल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांच्यामध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार इरेश चप्पलवार, मंडळ निरीक्षक नितीन परदेशी, तलाठी मगदूम व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. आदिवासींना वाटप केलेल्या दळी जमिनी (सर्व्हे नंबर 19) ला …

Read More »

मुरूडमध्ये मतदार नोंदणी जनजागृती शिबिर

मुरूड : प्रतिनिधी येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, येथे तहसीलदार कार्यालय निवडणूक शाखा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी नोंदणी करणे, प्रभाग रचनेत नावांची अदलाबदल करणे, मृत्यू …

Read More »

बीएसएनएलच्या कारभारावर महाडकरांचा संताप

बिल वेळेवर भरतो मग सेवा का नाही; व्यापारी वर्गाचा संतापजनक सवाल महाड : प्रतिनिधी तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या सेवेचा गेल्या वर्षभरापासून बोजवारा उडाला असून, या खंडित सेवेमुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ऐकून घेण्यास स्थानिक पातळीवर अधिकारीदेखील नसल्याने ही सेवा म्हणजे वार्‍यावरची वरात झाली आहे. …

Read More »

नेरळकरांची तहान भागणार

मुख्यमंत्री पेयजल योजनेला पालकमंत्र्यांकडून तत्त्वतः मान्यता कर्जत : बातमीदार नेरळला नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वतः मान्यता दिली. नेरळची लोकसंख्या …

Read More »

काँग्रेसचे नेते मारुती देवरेंचा भाजपत प्रवेश

नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुका काँग्रेसचा राजीनामा दिलेले मारुती देवरे यांनी मंगळवारी (दि. 30) मुंबईत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रामचंद्र देवरे, परशुराम तेलंगे, सचिन मोदी यांच्यासह मारुती देवरे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा नेते …

Read More »

युवक मंडळाकडून मुंगोशी येथे वृक्षारोपण

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगोशी गावामधील युवक मंडळाच्या पुढाकाराने रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत गावाजवळील मुंगोशी फाटा ते पूल दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस 200 झाडे लावण्यात आली. त्यासाठी युवक, ग्रामस्थ व महिलांनी श्रमदान केले. सुरुवातीस खड्ड्याचे व झाडांचे तसेच त्यासाठी लागणारे  कुदळ, फावडा, घमेले, पहार, कोयता …

Read More »

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मुरुड : संजय करडे पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय …

Read More »

विवेक भालेराव, युवराज वलिंद्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार  महापुरात नाला पार करीत असताना दहिगाव इंजिवली (ता. कर्जत) येथील विवेक भालेराव (वय 17) तरुण वाहून गेला होता. राज्य शासनाच्या वतीने मृत विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गटारात पडून मृत्यू पावलेल्या माथेरानमधील युवराज या बालकाचे वडील धीरज वारीद्रे यांना …

Read More »

राजनाल्याचा बांध फुटल्याने शेतीचे नुकसान

कडाव : प्रतिनिधी मागील चार-पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील राजनाल्याचा बंधारा तांबस गावाजवळ फुटल्याने परिसरातील भात लागवड झालेल्या जमिनीचे  नुकसान झाले. मात्र अद्यापही या ठिकाणी स्थानिक यंत्रणा फिरकली नसल्याने शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. 26 आणि 27 जुलै रोजी कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात कर्जत तालुक्यातील …

Read More »

पाली येथील जुन्या पोलीस ठाण्याची भिंत ढासळली

पाली : प्रतिनिधी येथील रामआळीजवळ ब्रिटिशकालीन दगडी इमारतीमध्ये पोलीस ठाणे आणि न्यायालय होते. मुसळधार पावसामुळे या इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे येथून जाणार्‍या येणार्‍यांसाठी धोका निर्माण झाला आहे. या ब्रिटिशकालीन चिरेबंदी वास्तूत पोलीस ठाणे आणि न्यायालयासह तहसील व उपलेखा कार्यालय देखील होते. ही सर्व कार्यालये नवीन इमारतीत हालविण्यात आली आहेत. त्यामुळे …

Read More »