भाजप नेते अण्णा कंधारे यांचा इशारा; शेगवाडा परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम मुरूड : प्रतिनिधी शहरातील शेगवाडा परिसरातील नाल्यावर मुरूड नगर परिषदेने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात तेथील घरांत व बागायत जमिनीत पाणी घुसून नागरिकांच्या मालमतेचे नुकसान होणार आहे. हे बांधकाम त्वरित तोडावे, अन्यथा जनआंदोलन उभे करून नगर परिषदेला जेरीस आणल्याशिवाय स्वस्थ …
Read More »रायगडसाठी 45 लक्ष रोपांची निर्मिती
अलिबाग : जिमाका राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळीतंर्गत या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात 30 ठिकाणी रोपवाटिका तयार करून 45 लाख 78 हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत यांनी …
Read More »मृत्युमुखी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांस मदत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकत असलेली सारिका सीताराम काटे या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. आदिवासी विकास विभागाने त्याची दखल घेतली होती. सारिकाच्या नातेवाईकांना नुकताच मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सारिका काटे ही विद्यार्थिनी वंजारवाडी येथे आपल्या वडिलांसह फार्महाऊसवर …
Read More »महाडमध्ये सुलभ साधना शिबिर
पोलादपूर : भारतीय योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रोज सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत स्थूलता निवारणार्थ सुलभ साधना वर्ग सुरु असून, तो 28 जुलै 2019पर्यंत चालणार आहे. नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने एका महिन्यात तीन ते आठ किलोपर्यंत वजन कमी होणार्या या वर्गात …
Read More »डॉक्टर्स असोसिएशनतर्फे जाहीर व्याख्यान
महाड : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून महाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 30) दुपारी 4 वाजता येथील विरेश्वर देवस्थान हॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कै. डॉ. नितीन कुंद्रीमोती पुण्यस्मरण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध हृदयशल्य चिकित्सक डॉ. अन्वय मुळे (फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड) यांचे ’यज्ञ अवयव …
Read More »माथेरानमध्ये जोरदार वर्षावृष्टी
कर्जत : बातमीदार जून महिन्याचे तीन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माथेरान जनजीवन विस्कळीत झाले आहे. माथेरान हे उंच पर्वत शिखरावर घनदाट जंगलात वसलेलं पर्यटनस्थळ असून, दरवर्षी येथे 250 ते 300 इंच पाऊस पडतो. मात्र या वर्षी जून महिन्यात पावसाने …
Read More »मुसळधार पावसाचा जोर कायम
महाडमध्ये दोन दिवसांत 195 मिमी पावसाची नोंद महाड : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांत महाड परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मागील चोवीस तासात महाड परिसरात 195 मिमी पावसाची नोंद झाली, तर एकूण पाऊस 360 मिमी झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे असले तरी महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने दमदारपणे …
Read More »मुसळधार पावसाने रायगडला झोडपले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 28) मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कामावर निघालेले नोकरदार आणि शाळा-कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे जलसंकट टळले असून, बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेला मान्सून अखेर जिल्ह्यात …
Read More »खालापुरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. त्याच्यासह अन्य तीन संशयित रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. करंबेळीत गेल्या दोन-चार दिवसांपासून तापाची साथ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातील गणेश महाडिक (27) याला अशक्तपणा जाणवू लागल्याने वावोशी प्राथमिक …
Read More »‘स्माईल प्लस’ने आणले मनोरुग्णांच्या चेहर्यावर हास्य
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणार्या आठ जणांची सुटका पुण्याच्या स्माईल प्लस फाऊंडेशनने पोलिसांच्या मदतीने केली. आठपैकी चार जण मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणार्यांविरोधात पोलीस काय कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले असता चार …
Read More »