Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला अभिषेकाचा मान ; चार देशांच्या राजदूतांची हजेरी

महाड ः प्रतिनिधी रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर एकच गर्दी केली होती. या वेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला होता. राज्यात …

Read More »

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा

महाड ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड संस्थेतर्फे गुरुवारी (दि. 6) तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने महाड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारखेप्रमाणे 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी …

Read More »

वांजळे तलाव गाळमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

श्रमदानातून तलावाची साफसफाई कडाव ः वार्ताहर : सध्या सर्वत्र भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील वांजळे येथील गावतलाव गाळमुक्त करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रमदानातून तलावाचा गाळ काढण्यास सुरुवात …

Read More »

नागोठण्यातील पेट्रोल पंपाविरोधात तहसीलदारांना निवेदन

नागोठणे ः प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर डिझेल तसेच पेट्रोल शिल्लक नसल्याबाबत पाटी लावली जात असली तरी रात्रीच्या वेळी मात्र मोठ्या ट्रेलर्सना डिझेल दिले जाते व स्थानिक वाहनचालकांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह तालुका सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर …

Read More »

नागोठणे पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा

नागोठणे ः प्रतिनिधी : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता प्रार्थनास्थळासमोर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे तसेच पोलीस कर्मचारी वर्गाकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, अशफाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, …

Read More »

अन्नदान करून रमजान ईद साजरी

खालापूर ः प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा पवित्र सण खोपोली शहरातील खालची खोपोली व कृष्णानगर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी सहज सेवा फाऊंडेशन खोपोलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना अन्नदान उपक्रमात शिरखुर्मा व जेवण देऊन ईद साजरी करण्यात आली. रुग्णालयात दाखल असणार्‍या …

Read More »

सामाजिक सलोखा आबाधित राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन -पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय निगोठ

मुरूड ः प्रतिनिधी : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची असून यामधूनच …

Read More »

खासदार सुनील तटकरेंच्या सत्कार समारंभातच शेकापच्या महादेव दिवेकरांना अटक

पेण : अनिस मनियार पेण तालुक्यातील ज्येष्ठ शेकाप नेते आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य महादेव दिवेकर यांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. 4) अटक केली. एका जागेच्या अपहार व्यवहाराबाबत सुरू असलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने महादेव दिवेकर यांना हजर करण्याबाबत अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने ही …

Read More »

शेकापचे अ‍ॅड. परेश देशमुख यांचा पत्नीसह भाजपत प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस व विद्यमान चेंढरे ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. परेश देशमुख यांनी आपली पत्नी मीनाक्षी देशमुख यांच्यासह मंगळवारी (दि. 4) भाजपात प्रवेश केला. चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत मीनाक्षी देशमुख यांना भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे थेट सरपंचपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, असे भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. …

Read More »

आमदार प्रवीण दरेकर यांचा पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

भाजपच्या वतीने महाडमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप महाड : प्रतिनिधी : महाड-पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी भाजपा पुढे सरसावली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्या वाटण्याचा संकल्प केला आहे.  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी …

Read More »