Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विहिरी आटल्या अन् कूपनलिका कोरड्या

कळंबमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाई; ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मागील 10 वर्षातील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या पाचही विहिरी आटल्या असून,  बोअरवेल कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हे गाव पाणी …

Read More »

उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू

कर्जत ः प्रतिनिधी शेलू गावातील केबिकेनगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. शेलू गावात सातत्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी उल्हास नदीतपात्रात पोहायला गेलेला तांबे कुटुंबातील आयुष हा 14 वर्षांचा मुलगा …

Read More »

रायगड जिल्ह्यात बारावीचा 84.97 टक्के निकाल ; यंदाही मुलींनीच मारली बाजी

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल घटला आहे. गेल्या वर्षी 86.87 टक्के निकाल लागला होता. उत्तीर्ण होण्यात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. 80.05 टक्के मुले, तर …

Read More »

उल्हास नदीचे पाणी आणखी दूषित करण्याचा प्रयत्न

गाड्या धुण्यासाठी वाहत्या पाण्यात कर्जत : बातमीदार : टाटा पॉवर हाऊसमधून सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीतून  कल्याणच्या खाडीपर्यत वाहत जाते, ते पिण्यासाठी राखीव असल्याने या नदीच्या पाण्यावर काही शहरे आणि शेकडो गावांची तहान भागविली जाते. मात्र या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून, जलपर्णी पाठोपाठ आता या नदी पात्रात गाड्या घुतल्या …

Read More »

कुरूळ ग्रामपंचायत राबविणार कन्या सन्मान योजना

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये जन्माला येणार्‍या मुलींसाठी कुरूळ कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच अ‍ॅड. जर्नादन पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली. कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील महिलेस  जर पहिले अपत्य कन्या असेल तर त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत …

Read More »

नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मताधिक्य

खासदारांनी केला महायुतीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार कर्जत : बातमीदार : खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळ गावातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विजयानंतर महायुतीचे नेरळमधील पदाधिकारी खासदार बारणे यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, खासदार बारणे यांनी या पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. मावळ लोकसभा निवडणुकीचा कर्जत विधानसभा मतदारसंघातील निकाल हा अपेक्षितपणे लागला आहे. नेरळमधील मतदारांनी …

Read More »

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करा -आ. प्रवीण दरेकर

महाड तालुक्यातील अधिकार्‍यांची आढाव बैठक महाड : प्रतिनिधी : टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर किंवा बोअरवेल या सर्व तात्पुरत्या उपाययोजना असून, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे गरजेच्या आहे. संबंधीत अधिकार्‍यांनी छोटे -मोठे बंधारे, विहिरी आणि तलाव बांधण्याचे प्रस्ताव तात्काळ तयार करावेत, अशा सूचना आमदार प्रवीण देरेकर यांनी सोमवारी येथे …

Read More »

पॅराशूट अपघातप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; जामिनावर सुटका

मुरुड : प्रतिनिधी येथील समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना झालेल्या अपघातात  शनिवारी वेदांत पवार (वय 15) याचा मृत्यू तर त्याचे वडील गणेश पवार (वय 40) गंभीर जखमी झाले होते.  या अपघात प्रकरणात मुरुड पोलिसांनी पॅराशूट चालक सागर प्रदीप चौलकर यांच्यासह मुश्ताक बशीर मोडक, दिनेश धर्मा वाघमारे व मारुफ अस्लम शेख यांच्यावर …

Read More »

‘पत्रकारांवर हल्ले करणार्यांना कडक शासन करा’

महाड : प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ समजल्या जाणार्‍या पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मतमोजणी दिनी अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर झालेल्या मारहाणी विरोधात पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. महाड पत्रकार संघाच्या वतीने या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, या मागण्या करीत मंगळवारी (दि. 28)  महाड …

Read More »

पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के

पेण : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून त्यात पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के लागला आहे. तालुक्यातील 1805 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 1803 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधून 1579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  तालुक्यामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कुलने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. या प्रशाळेचा कला, वाणिज्य आणि …

Read More »