Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मोबाइल टॉवर्सप्रमाणेच वणवे, तरव्यांमुळेही तापमानात वाढ ; पोलादपूरवासीयांना तापमानवाढीचा ताप

पोलादपूर ः प्रतिनिधी रोमिंगमधील मोबाइल ग्राहकांना नेटवर्क क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पोलादपूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सप्रमाणेच उन्हाळा सुरू होताच लागणारे वणवे, तरवे आणि वीटभट्टी व्यवसायही तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते, मात्र तापमानवाढीच्या नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत ठरणार्‍या या प्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी कोणतेही कायदेशीर उपाय करण्यात आल्याचे दिसत नसल्याने …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश ; शासकीय रुग्णालयाला अचानक भेट

अलिबाग ः प्रतिनिधी   रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 14) अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी रुग्णांनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करा, असे आदेश पालकमंत्री रवींद्र …

Read More »

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक धास्तावले

खोपोली ः प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. ही मान्सूनपूर्व पावसाची चाहूल असल्याने पाऊस आल्यास नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदार, उत्पादकांनी आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी दाखल केल्याने आंब्याची आवक अचानक वाढली आहे, मात्र बाजारात दाखल होत असलेला आंबा पिकण्यासाठी पूर्ण तयार …

Read More »

महाविरतणकडून खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना सुरुवात

खोपोली : प्रतिनिधी वीजवितरण कंपनीकडून मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करून खोपोली शहरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. यात विजेचे खांब व वीजवाहिनींना खेटलेली झाडी छटाई, वीजवाहिनी दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. मात्र खोपोली हद्दीत महामार्गाच्या बाजूच्या वीज वाहिन्यांखालील झाडांची छटाई करतांना …

Read More »

खानावजवळ गॅसचा टँकर पलटी

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील खानाव- वेलवली रस्त्यावर मंगळवारी (दि. 14) गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. टँकरमध्ये 18 टन गॅस होता. सुदैवाने वायूगळती न झाल्याने मोठी हानी टळली.  या अघातात टँकरचा चालक  भरत प्रभाकर धनवे (वय 30, रा. चेंबूर) जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा …

Read More »

संभाजी महाराज यांना कर्जत येथे अभिवादन

कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त दहिवली कर्जत येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कथन केला. कर्जत-मुरबाड महामार्ग येथे दहिवली नाक्यावर असलेल्या नामफलकाला वसंत …

Read More »

माथेरानमध्ये कोकणवासियांचा महोत्सव

सांस्कृतिक कार्यक्रमांना पर्यटकांचीदेखील गर्दी कर्जत : बातमीदार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने कोकणवासिय समाज या संस्थेने विर भाई कोतवाल प्राथमिक शाळा व असेंम्बली हॉलच्या प्रांगणात कोकण महेत्सवाचे दिमाखदार आयोजन केले होते. या दोन दिवसीय महोत्सवात अनेक बहारदार कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात कोकणवासिय तरुण तरुणींनी सहभाग …

Read More »

नेरळ जंक्शन स्थानकाकडे रेल्वेचे दुर्लक्ष

फलाट निवारा शेडविना, एकच पादचारी पूल कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकातील समस्येकडे बघायला रेल्वे प्रशासनाला वेळ नाही, असे चित्र आहे.कारण या स्थानकातील निम्मा भाग हा निवारा शेड विना आहे. माथेरानला जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरावे लागते, पण येथे एकच पादचारी पूल आहे. तर …

Read More »

चई गावातील विजेचे खांब कोसळण्याच्या स्थितीत; महावितरणचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील चई गावात 30 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले विजेचे खांब जिर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी उपस्थित केला आहे. …

Read More »

उन्हाळी शिबिरात बालगोपाळ रमले

महाड : प्रतिनिधी : अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली शहरातील बच्चे कंपनी आता सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरात रमले असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांनाही अशा विनामुल्य उन्हाळी शिबिराचा आनंद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यामुळे मिळाला आहे. आपल्याच शाळेत झालेल्या या शिबीरात मुले आनंदाने रमूनही गेली. …

Read More »