Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार …

Read More »

कर्जत, नेरळ, कडाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री 12 दुकाने फोडली; हजारो रुपयांचा माल लंपास कर्जत : बातमीदार नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना कर्जत शहरात मंगळवारी (दि. 7) रात्री 5 ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या साई मंदिर परिसरात  5, पोशिर येथे 1 तर डिकसळ येथे 1 मेडिकल  अशी सुमारे …

Read More »

मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा पडले बंद

पर्यटकांचा अर्धा तास खोळंबा कर्जत : बातमीदार सध्या माथेरानला जाणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र तेथील मिनिट्रेनचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिनमध्येच बंद पडले आणि प्रवाशी पर्यटकांचा खोळंबा झाला. माथेरानला मिनीट्रेनमधून जाण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक नेरळ येथे येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता मिनिट्रेनच्या  दिवसभरात केवळ …

Read More »

शाळेला जातो आम्ही…

जिल्ह्यात दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके अलिबाग : प्रतिनिधी सर्वशिक्षा अभियानातंर्गत सरकारतर्फे रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. ही पुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, …

Read More »

माथेरानमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात

कर्जत : बातमीदार : शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माथेरानमध्ये  मंगळवारी (दि. 7) तिथीनुसार शिवजयंती उत्सव अतिउत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी केले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता माथेरान शहरातील श्रीराम चौकात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात …

Read More »

लग्नसराई व सुट्ट्यामुळे बसेसना तुंडब गर्दी

गर्मीमुळे प्रवाशी होतात हैराण रोहे ः प्रतिनिधी  : शाळांच्या सुट्ट्या व लग्नसराई यामुळे सध्या लोकांची धावपळ सुरु असून, एसटी बसेस व अन्य खाजगी प्रवाशी वाहनांना तुंडब गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या पाहिल्याच आठवडयात सर्वत्र प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान,  वाढत्या उकड्याने सर्वच हैराण होत असून, घामाने …

Read More »

कर्जत मोग्रजमध्ये टंचाई…

पाणी पुरवठ्यासाठी सरपंच, सदस्य सरसावले;स्वखर्चाने ट्रँकर सुरू कर्जत : बातमीदार : तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतहद्दीत तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी स्वखर्चाने ट्रँकर सुरू केले आहेत. कर्जत तालुक्यातील मोग्रज भागात असलेल्या मेचकरवाडी, जांभूळवाडी, मोग्रज वाडी, आनंदवाडी, मालेगाव, जाधववाडी, आनंदवाडी या आदिवासी वाड्यात आणि मोग्रज, धामणी, पिंगळस, …

Read More »

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन समाजाच्या श्री चंद्रप्रभू देवस्थानच्या वतीने वर्षीतप पारणोत्सव व पंचान्हिका जिनभक्ती महोत्सवानिमित्त वरघोडा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस घेण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन आचार्य देव अजितशेखर सुरीश्वरजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी …

Read More »

पत्नीचा खून करणारा पती अडीच दिवसात जेरबंद

कर्जत : बातमीदार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून, पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या पतीला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसात जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आपल्या माहेरी राहत असलेल्या भीमा हिच्या डोक्यात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिचा पती योगेश भला याने कोयत्याचे वार केले. …

Read More »

उद्योजक अशोक मित्तल यांचे बेकायदा बांधकाम पाडणार -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

कोळगाव येथील अधिकृत बांधकाम निश्चित करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या लिटोलियर ग्रुपचे अशोक मित्तल यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटीस मित्तल याना दिली होती. त्यानुसार अशोक …

Read More »