Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

द्रुतगतीवर ऊर्से येथे सूचना फलक गर्डर

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा हद्दीतील ऊर्से गावाजवळ महाकाय गर्डर बसविण्यात आले आहे. या गर्डरवर महामार्गावर कुठे वाहतूक ठप्प आहे, कुठे अघटित घटना घडली आहे, सध्याची स्थिती व अंतर अशा सूचना वाहनचालक व प्रवाशांना मिळणार आहेत. हे गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता नम्रता …

Read More »

शिरवलीवाडीमधील महिलांनी काढला विहिरीतील गाळ

खोपोली : प्रतिनिधी खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडीमधील महिलांनी पुढाकार घेत विहिरीतील गाळ काढला आहे. शिरवलीवाडीत पवार कुटूंबाची खाजगी विहीर आहे. या विहिरीलगत असलेल्या तलावातून पाझर पद्धतीने विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर इतर दैनंदिन कामाकरिता केला जातो. या विहिरीतील गाळ काढण्यासाठी शिरवलीवाडीतील महिलांनी पुढाकार घेतला.वाडीतील …

Read More »

खोपोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची मागणी

खोपोली : प्रतिनिधी  येथील रेल्वे स्थानकातून गरजू प्रवाशांना ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक रिक्षा चालकांकडून येथे अधिकृत रिक्षा स्टँड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासन व खोपोली नगरपालिकेकडून यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच रिक्षा परिसरातील रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येथे …

Read More »

नेरळ धरणात अस्वच्छ पाणी आणि माती कचर्याचा ढीग

धरणातील गाळ काढण्याची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरण परिसर अस्वच्छतेच्या खाईत सापडले आहे. धरणात माती आणि गाळ साचले असून पावसाळा तोंडावर आला असल्याने धरणातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायत धरणातील गाळ दरवर्षी काढत नसल्याने पाण्याचा साठादेखील कमी होत आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी कॉलेज …

Read More »

रस्त्याचे काम वनविभागाने रोखले

मोरेवाडी ते गावंडवाडी मार्गासाठी आणलेली खडी जप्त; ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार कर्जत : बातमीदार परवानगी न घेताच आपल्या जमिनीतून रस्ता केला जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्या ठिकाणी वनरक्षक उभा करुन, मोरेवाडी ते गावंडवाडी या रस्त्यासाठी टाकलेली खडी जप्त केली आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याच्या कारवाईस वन …

Read More »

रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग ः सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवर होणारे हल्ले तसेच रुग्णालयांमधील इतर घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 14 रुग्णालयांत 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास …

Read More »

पोशीर येथील साठवण विहिरीत शेवाळ आणि जलपर्णी

पाणीपुरवठा कमिटीचे दुर्लक्ष; वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही कर्जत : बातमीदार बिरदोले गावाजवळ उल्हास नदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे. पोशीर ग्रामपंचायतीची 1967 पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा …

Read More »

खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी परिसरात पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही  खोपोली नगरपालिकाहद्दीतील लौजी गाव तसेच उंचावर असलेल्या रहिवाशी भागांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लौजी गावाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. खोपोली नगरपालिकेची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित …

Read More »

अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले

सुधागड पाली ग्रामपंचायतीची कारवाई; मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ रस्ता झाला मोकळा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छी विक्रेते बसत होते. या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच हटविले आहे. तसेच  या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी बसणार्‍यावर कायेदेशीर कारवाई …

Read More »

जागतिक क्षितिजावर चमकणार रायगडचे सात तारे ; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी निवड

पेण ः प्रतिनिधी नासा, जपान, रशिया, इस्त्रो, चायना, युरोपियन देश वगैरेंशी संलग्न असणार्‍या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील सात, तर कल्याणमधील एकाची युवकाची निवड झाली आहे. 1951 साली स्थापन झालेल्या या संस्थेची ही 70वी परिषद असून आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची अथवा संस्थेची निवड या परिषदेसाठी झाली नव्हती, मात्र ऑक्टोबर …

Read More »