Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन समाजाच्या श्री चंद्रप्रभू देवस्थानच्या वतीने वर्षीतप पारणोत्सव व पंचान्हिका जिनभक्ती महोत्सवानिमित्त वरघोडा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस घेण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन आचार्य देव अजितशेखर सुरीश्वरजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी …

Read More »

पत्नीचा खून करणारा पती अडीच दिवसात जेरबंद

कर्जत : बातमीदार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून, पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या पतीला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसात जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आपल्या माहेरी राहत असलेल्या भीमा हिच्या डोक्यात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिचा पती योगेश भला याने कोयत्याचे वार केले. …

Read More »

उद्योजक अशोक मित्तल यांचे बेकायदा बांधकाम पाडणार -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

कोळगाव येथील अधिकृत बांधकाम निश्चित करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या लिटोलियर ग्रुपचे अशोक मित्तल यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटीस मित्तल याना दिली होती. त्यानुसार अशोक …

Read More »

मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन

मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड किनार्‍यावर पाच फूट लांब व 60 किलो वजनाचा मृत डॉल्फिन वाहून आल्याने मुरूडच्या प्राणिमित्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनार्‍यावर डॉल्फिन उड्या मारताना पाहायला मिळत असल्याने भारतातून अनेक पर्यटक कोकणात येतात. नुकतेच आगरदांडा परिसरातील किनारपट्टीवर डॉल्फिन उड्या मारताना पाहिले …

Read More »

धापया महाराजांचा दर्शनाला कर्जतमध्ये गर्दी

कर्जत : प्रतिनिधी : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव  अक्षयतृतिये (दि. 7) पासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या  दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या बुधवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजल्यापासून श्री धापया महाराज मंदिराच्या प्रांगणात शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला …

Read More »

टंचाईवर मात करण्यासाठी पालीत बैठक

उपाययोजनांवर भर देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी : जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुधागडातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना  पाणीटंचाईच्या झळा पोहचत असून, तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी  भटकंती सुरु झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी  तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी मंगळवारी (दि. 7)  तहसिल कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. त्यात पाणी …

Read More »

लोकसभा निवडणुकीत आपला विजय निश्चीत

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा विश्वास; मतदारांचे आभार मानण्यासाठी महाडमध्ये मेळावा महाड : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला भरभरुन मतदान केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मोठी आघाडी मिळेल. त्यामुळे या निवडणूकीत आपला विजय निश्चीत आहे, असा विश्वास केंद्रिय मंत्री अनंत …

Read More »

पालको कारखान्यात कामगार-व्यवस्थापन स्नेहसंमेलन

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीतील पालको या कारखान्यातील कामगार व व्यवस्थापनाचे स्नेहसंमेलन सोमवारी (दि. 6) उत्साही वातावरणात साजरे झाले. या कार्यक्रमात कामगार, अधिकारी व मालक आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. या स्नेहसंमेलनत सर्वजण मतभेद विसरून वैचारिक देवाणघेवाण करतात. त्यामुळे कामगार व व्यवस्थापन यामधील दरी कमी होऊन, कारखान्यात …

Read More »

सुक्या मासळीचे दर भिडले गगनाला

दासगावचा मासळी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील दासगाव येथे भरणार्‍या मासळी बाजाराला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. यामुळे या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाजारातील सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह घावूक व्यापारीदेखील हबकले आहेत. महाड तालुक्यातील दासगावमधील आठवडी …

Read More »

जि. प. कर्मचार्यांसाठी 8 मेपर्यंत वैद्यकीय शिबीर

अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी  : रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सोमवार (दि. 6)पासून 8 मेपर्यंत विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, यांची उपस्थिती …

Read More »