Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

ख्रिस्ती बांधवाचा ‘माय दे देऊस‘ उत्सव

रेवदंडा : प्रतिनिधी येथील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावातील अनेक वास्तू, चर्च आजही पोर्तुगीज काळाची साक्ष देत आहेत. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस‘ हा चर्चसुध्दा त्या काळाचा साक्षीदार असून, या प्रार्थना स्थळात ख्रिस्ती बांधव श्रध्दा व भक्तीने विविध उत्सव साजरे करतात. प्रतिवर्षी 5 मे रोजी ‘माय दे देऊस‘ उत्सव …

Read More »

बोडणी येथील खुन्याला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी पैशाच्या वादावरून लोखंडी हातोड्याने सहकार्‍याला ठार मारणार्‍या आरोपीला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप तसेच पैसे चोरल्याप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. संजयकुमार भारतीप्रसाद मेस्त्री (वय 19) असे मृत इसमाचे नाव होते. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रविासी होता. सध्या बोडणी येथे कामानिमित्त …

Read More »

माणगांवात विदेशी दारुसाठा जप्त

माणगांव : प्रतिनिधी ड्रममध्ये विदेशी दारुचे बॉक्स लपवून ते अवैधरित्या विक्री करीता घेवून जात असलेल्या टेम्पोचा पाठलाग करुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने विदेशी दारुसह सुमारे 7 लाख 12हजार 712 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघाजणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना शनिवारी …

Read More »

नागोठणेत पाच दिवसीय वर्षीतप पारणोत्सवास प्रारंभ

नागोठणे : प्रतिनिधी येथील जैन बंधुभगिनींनी केलेल्या साडेचौदा महिन्यांच्या उपवासाची सांगता मंगळवारी (दि. 7) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे. या धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार (दि. 3) पासून झाला असून 6 मे रोजी चौदा महिन्यांचा उपवास केलेल्या तपस्वींची शोभा यात्रा काढण्यात येणार असून, मंगळवारी (दि. 7) सामूहिक वर्षीतप पारणोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या …

Read More »

पाणी चोरट्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल ; श्रीवर्धन नगर परिषदेचा कारवाईचा बडगा

श्रीवर्धन : प्रतिनिधी पंप लावून पाणी चोरणार्‍या श्रीवर्धन शहरातील सुमारे पन्नास जणांवर गुन्हे दाखल करुन नगर परिषदेने कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील पाणी चोरांचे धाबेदणाणले आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवण्यात येते. शहरात काही ठिकाणी थेट जलवाहिनीला विद्युत पंप लावून पाणी चोरी करण्यात …

Read More »

पाण्यासाठी महिला आक्रमक

नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली; ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा इशारा कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेली ग्रामसभा विविध विषयांनी गाजली. ग्रामसभेत महिलांनी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्यावरुन धारेवर धरले, तर उपोषण करून आठ महिने झाल्यानंतरदेखील आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने ज्येष्ठ नागरिक माधव गायकवाड यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, वाढते नागरीकरण …

Read More »

नेरळ-माथेरान घाटातील टेकडी वनव्याच्या भक्ष्यस्थानी ; 10 तास वन कर्मचारी जंगलात, अग्निशमन बंबाची मदत

कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान 15 किलोमीटरचा परिसरातील जंगल जळून खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी हे शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यन्त जंगलात फिरून आग विझवत होते, तर कर्जतचे तहसीलदार हेदेखील मध्यरात्रीपर्यन्त घटनास्थळी उपस्थित होते.दरम्यान, जंगलातील हा वणवा विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडून अग्नीशमन यंत्रणादेखील तात्काळ पाठविण्यात …

Read More »

पारवाडी-आदिवासीवाडी तहानलेली

पाणी टंचाई नियोजनासाठी आमदार गोगावलेंनी कंबर कसली महाड : प्रतिनिधी : तालुक्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. आमदार …

Read More »

कर्जत आगारातील आठ कामगारांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार : एसटीच्या कर्जत आगारातील आठ कामगारांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या, मात्र कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने या आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. सोमवारपासून या आठ पैकी दर चार दिवसांनी दोन दोन कामगारांना …

Read More »

टेंबरे ग्रामपंचायतीमध्ये आठ कुपोषित बालके

कर्जत : बातमीदार : कम्युनिटी ऍक्शन फॉर न्यूट्रिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात तेथील तीन आदिवासी वाड्यात 8 बालके कुपोषित आढळली आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाचा कर्जत तालुक्यात कुपोषण नाही, हा दावा फोल ठरला आहे. दिशा केंद्राच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य …

Read More »